YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशया 18

18
कूशाविषयीचे भाकित
1अरे, कूशातील नद्यांपलीकडल्या फडफडणार्‍या पंखांच्या देशा!
2तो पाण्यावर चालणार्‍या लव्हाळ्यांच्या नावांतून जलमार्गाने वकील पाठवतो. शीघ्रगती दूतांनो, त्या उंच बांध्याच्या व तुळतुळीत अंगाच्या राष्ट्रांकडे जा; ते लोक मुळापासूनच भयंकर आहेत. ते हुकूमत चालवणारे व पादाक्रांत करणारे राष्ट्र आहे; त्याची भूमी नद्यांनी विभागलेली आहे.
3अहो भूतलवासी अखिल जनहो, पृथ्वीवरील रहिवाशांनो, पर्वतांवर ध्वज उभारण्यात येईल तेव्हा तुम्ही पाहा; तुतारी वाजवण्यात येईल तेव्हा ऐका.
4परमेश्वराने मला सांगितले की : “सूर्य प्रकाशत असता स्वच्छ ऊन पडते व कापणीच्या समयी उष्णकाळी दहिवरयुक्त अभ्र येते, तसा मी शांत राहून आपल्या निवासस्थानातून अवलोकन करीन.”
5कारण मोहर गळाल्यावर त्याच्या जागी द्राक्षे येऊन पिकायला लागतात, तेव्हा हंगामापूर्वी तो कोयत्यांनी डाहळ्या छाटील व पसरलेल्या फांद्या तोडून टाकील.
6डोंगरांवरील अधाशी पक्ष्यांसाठी व देशातील गुराढोरांसाठी त्या सर्व पडून राहतील; त्यांवर अधाशी पक्षी उन्हाळा काढतील आणि देशातील सर्व गुरेढोरे हिवाळा काढतील.
7त्या वेळेस उंच बांध्याचे व तुळतुळीत अंगाचे लोक, मुळापासून भयंकर, हुकूमत चालवणारे, पादाक्रांत करणारे, ज्या राष्ट्राची भूमी नद्यांनी विभागलेली आहे, त्या लोकांकडून सेनाधीश परमेश्वराचे नाम दिलेल्या स्थळी म्हणजे सीयोन डोंगरावर सेनाधीश परमेश्वराला नजराणे अर्पण करण्यात येतील.1

सध्या निवडलेले:

यशया 18: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन