होशेय 4
4
1नंतर इस्राएल लोक परततील आणि आपला देव परमेश्वर व आपला राजा दावीद ह्यांना शरण येतील; ते शेवटच्या दिवसांत भीतीने कंपित होऊन परमेश्वराचा व त्याच्या चांगुलपणाचा आश्रय करतील.” इस्राएलाशी परमेश्वराचा वाद 4 इस्राएल लोकहो, परमेश्वराचे वचन ऐका, कारण देशातून सत्य, दया, व देवज्ञान ही नाहीतशी झाल्यामुळे परमेश्वर ह्या देशाच्या रहिवाशांबरोबर वाद करीत आहे.
2शपथ वाहून ती मोडणे, मनुष्यवध करणे, चोरी करणे, व्यभिचार करणे ह्यांना ऊत आला आहे; रक्तपातामागून रक्तपात होत आहेत.
3ह्यामुळे देश शोक करीत आहे व त्यातील सर्व रहिवासी व त्यांच्याबरोबर वनपशू व आकाशातील पक्षी म्लान झाले आहेत; समुद्रातले मासेही नाहीतसे झाले आहेत.
4तरी कोणी विवाद करू नये, कोणी कोणाचा दोष काढू नये, कारण तुझे लोक याजकाबरोबर वाद घालणार्यांसारखे आहेत.
5तू दिवसा ठेच खाशील, रात्री तुझ्यासह संदेष्टाही ठेच खाईल आणि मी तुझ्या आईचा नाश करीन.
6ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झाला आहे. तू ज्ञानाचा अव्हेर केलास म्हणून मीही तुझा अव्हेर करीन; म्हणजे अर्थात मी याजकाचे काम तुला करू देणार नाही; तू आपल्या देवाचे नियमशास्त्र विसरलास म्हणून मीही तुझ्या मुलांना विसरेन.
7जसजशी ह्यांची संख्या वाढत गेली तसतसे ते माझ्याविरुद्ध पाप करीत गेले; मी त्यांचे वैभव पालटून त्याची अप्रतिष्ठा करीन.2
8ते माझ्या लोकांच्या पापावर पोसत आहेत, त्यांच्या अधर्माकडे त्यांचे चित्त लागले आहे.
9जसा याजक तसे लोक असे होईल; त्यांच्या आचरणाबद्दल मी त्यांना शासन करीन, त्यांच्या कर्माचे प्रतिफळ त्यांना देईन.
10ते खातील पण त्यांची तृप्ती व्हायची नाही; ते व्यभिचार करतील व त्यांची वाढ होणार नाही, कारण त्यांनी परमेश्वराकडे चित्त लावण्याचे सोडून दिले आहे.
11जारकर्म, द्राक्षारस व नवा द्राक्षारस विवेक नष्ट करतात.
12माझे लोक आपल्या लाकडाच्या ठोकळ्याला प्रश्न विचारतात; त्यांची काठी त्यांना शकुन सांगते; कारण अनाचारबुद्धीने त्यांना बहकवले आहे, परमेश्वराचा त्याग करणे हा अनाचार त्यांनी केला आहे.
13ते पर्वतांच्या माथ्यांवर यज्ञयाग करतात व टेकड्यांवर ओक, हिवर व एला ह्या झाडांची छाया चांगली असल्यामुळे त्यांच्याखाली धूप जाळतात; म्हणून तुमच्या कन्या व्यभिचार करतात व तुमच्या सुना जारकर्म करतात.
14तुमच्या कन्या व्यभिचार करतात व तुमच्या सुना जारकर्म करतात त्याबद्दल त्यांना मी शासन करणार नाही; कारण ते स्वतः वेश्यांकडे जातात व कसबिणींसह यज्ञ करतात; ह्यास्तव हे ज्ञानशून्य लोक नाश पावत आहेत.
15हे इस्राएला, तू जरी जारकर्म केले आहेस तरी यहूदाने अशा पापात पडू नये; गिल्गालास येऊ नका, व बेथ-आवेनास जाऊ नका, परमेश्वराच्या जीविताची शपथ वाहू नका.”
16कारण इस्राएल हट्टी कालवडीसारखा हट्ट करीत आहे; आता परमेश्वर विस्तीर्ण कुरणात कोकराप्रमाणे त्यांना चारील.
17एफ्राईम मूर्तीवर आसक्त झाला आहे, त्याचे नाव सोडून द्या.
18त्यांचा पानोत्सव आटोपल्यावर ते व्यभिचारात मग्न होतात; त्यांच्या सरदारांना3 अप्रतिष्ठा अति प्रिय आहे.
19वार्याने त्यांना आपल्या पंखांत लपेटून टाकले आहे; ते आपल्या यज्ञयागास्तव लज्जित होतील.
सध्या निवडलेले:
होशेय 4: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.