YouVersion लोगो
सर्च आयकॉन

इब्री 9:1-10

इब्री 9:1-10 MARVBSI

पहिल्या करारातही उपासनेचे विधी होते व पवित्रस्थान होते; पण ते पृथ्वीवरचे होते. कारण पहिला मंडप तयार केलेला होता त्यात दीपवृक्ष, मेज व समर्पित भाकरी होत्या; त्याला पवित्रस्थान म्हटले आहे. आणि दुसर्‍या पडद्याच्या पलीकडे परमपवित्रस्थान म्हटलेला मंडप होता; त्यात सोन्याचे धुपाटणे व सोन्याने चहूबाजूंनी मढवलेला कराराचा कोश होता; ह्या कोशात मान्ना ठेवलेले सुवर्णपात्र, कळ्या आलेली अहरोनाची काठी व कराराच्या पाट्या होत्या; आणि त्याच्यावरचे गौरवशाली करूबीम दयासनावर छाया करत होते; ह्यांविषयी आता सविस्तर सांगत नाही. ह्या वस्तूंची अशी व्यवस्था केलेली असता याजक उपासना करण्यास पहिल्या मंडपात नित्य जात असतात; परंतु दुसर्‍यात प्रमुख याजक एकटाच वर्षातून एकदा जात असतो तेव्हा स्वतःबद्दल व लोकांच्या अज्ञानाने झालेल्या पापांबद्दल1 जे रक्त अर्पण करत असतो, ते घेतल्याशिवाय जात नाही. तेणेकरून पवित्र आत्मा दर्शवतो की, पहिला मंडप उभा आहे तोपर्यंत परमपवित्रस्थानाची वाट प्रकट झाली असे नाही.2 तो मंडप वर्तमानकाळी दृष्टान्तरूप आहे; त्याच्या व्यवस्थेप्रमाणे उपासकाचा विवेकभाव पूर्ण करण्यास समर्थ नाहीत अशी दाने व यज्ञ अर्पण करण्यात येतात. खाणे, पिणे, नाना प्रकारची क्षालने ह्यांसह ती अर्पणे, केवळ दैहिक विधी आहेत; ते सुधारणुकीच्या काळापर्यंत लावून दिले आहेत.