YouVersion लोगो
सर्च आयकॉन

इब्री 5

5
1प्रत्येक प्रमुख याजक मनुष्यांमधून घेतलेला असून देवविषयक गोष्टींबाबत मनुष्यांकरता नेमलेला असतो, ह्यासाठी की, त्याने दाने व पापांबद्दल यज्ञ ही दोन्ही अर्पावीत.
2अज्ञानी व बहकणारे ह्यांच्याबरोबर तो सौम्यतेने वागू शकतो, कारण तोही स्वत: दुर्बलतेने वेष्टलेला आहे.
3आणि ह्या दुर्बलतेमुळे त्याने जसे लोकांसाठी तसे स्वत:साठीही पापांबद्दल अर्पण केले पाहिजे.
4हा मान कोणी आपण होऊन घेत नाही, तर ज्याला देवाने अहरोनाप्रमाणे पाचारण केले आहे त्याला मिळतो.
5त्याप्रमाणे ख्रिस्तानेही प्रमुख याजक होण्यासाठी आपल्या स्वत:ला गौरवले नाही, तर ज्याने त्याला म्हटले की,
“तू माझा पुत्र आहेस,
आज मी तुला जन्म दिला आहे,”
त्याने त्याला गौरवले.
6त्याप्रमाणेच दुसर्‍या ठिकाणीही तो म्हणतो,
“मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे
तू युगानुयुग याजक आहेस.”
7आपल्याला मरणातून तारण्यास जो समर्थ आहे त्याच्याजवळ त्याने आपल्या देहावस्थेच्या दिवसांत, मोठा आक्रोश करत व अश्रू गाळत प्रार्थना व विनवणी केली, आणि ती त्याच्या सद्भक्तीमुळे ऐकण्यात आली;
8तो पुत्र असूनही त्याने जे दुःख सोसले तेणेकरून तो आज्ञाधारकपणा शिकला;
9आणि परिपूर्ण केला जाऊन तो आपल्या आज्ञेत राहणार्‍या सर्वांचा युगानुयुगांच्या तारणाचा कर्ता झाला,
10आणि त्याला ‘मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे’ प्रमुख याजक असे देवाकडून संबोधण्यात आले.
खर्‍या ख्रिस्तशिष्याच्या मार्गाने प्रगती करण्याची आवश्यकता
11ह्याविषयी आम्हांला पुष्कळ सांगायचे आहे; ते तुम्हांला समजावून सांगणे कठीण आहे, कारण तुम्ही ऐकण्यात मंद झाला आहात.
12वास्तविक इतक्या काळात तुम्ही शिक्षक व्हायला पाहिजे होता, पण तुम्हांला देवाच्या वचनांची मुळाक्षरे पुन्हा कोणीतरी शिकवण्याची गरज आहे. आणि तुम्हांला दुधाची गरज आहे, जड अन्न चालत नाही, असे तुम्ही झाला आहात.
13कारण दुधावर राहणारा नीतिमत्त्वाच्या वचनाशी अपरिचित असतो; कारण तो बालक आहे;
14पण ज्यांच्या ज्ञानेंद्रियांना वहिवाटीने चांगले आणि वाईट समजण्याचा सराव झाला आहे अशा प्रौढांसाठी जड अन्न आहे.

सध्या निवडलेले:

इब्री 5: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन