ह्या कारणास्तव ऐकलेल्या गोष्टींकडे आपण विशेष लक्ष लावले पाहिजे, नाहीतर आपण त्यांपासून वाहवत जाऊ. देवदूतांच्या द्वारे सांगितलेले वचन जर दृढ झाले आणि प्रत्येक उल्लंघनाचे व आज्ञाभंगाचे यथान्याय फळ मिळाले, तर आपण एवढ्या मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष केल्यास आपला कसा निभाव लागेल? ते सांगण्याचा आरंभ प्रभूकडून झाला असून, ते ऐकणार्यांनी त्याविषयी आपल्याला प्रमाण पटवले; त्यांच्याबरोबर देवानेही चिन्हे, अद्भुते व नाना प्रकारचे पराक्रम करून आणि आपल्या इच्छेप्रमाणे पवित्र आत्म्याची दाने वाटून देऊन साक्ष दिली. आम्ही ज्या भावी जगाविषयी बोलत आहोत ते त्याने देवदूतांच्या अधीन ठेवले नाही. तर एका ठिकाणी कोणी अशी साक्ष दिली आहे, “मर्त्य मानव तो काय की तू त्याची आठवण करावीस? अथवा मानवपुत्र तो काय की तू त्याला दर्शन द्यावेस? तू त्याला देवदूतांपेक्षा काही काळापुरते कमी केले आहेस; तू त्याला गौरव व थोरवी ह्यांनी मुकुटमंडित केले आहेस; आणि तू आपल्या हातच्या कृत्यांवर त्याला नेमले आहेस; तू सर्वकाही त्याच्या अधीन — त्याच्या पायांखाली — ठेवले आहेस.” ‘सर्वकाही त्याच्या अधीन ठेवले आहेस,’ म्हणजे त्याच्या अधीन ठेवलेले नाही असे काही राहू दिले नाहीस; परंतु ‘सर्वकाही त्याच्या अधीन ठेवले आहेस,’ असे अजून आपल्या दृष्टीस पडत नाही खरे.
इब्री 2 वाचा
ऐका इब्री 2
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: इब्री 2:1-8
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ