त्या सुकाळाच्या सात वर्षांत जमिनीस भरघोस पीक आले. त्याने ह्या सात वर्षांत मिसर देशातील सर्व प्रकारची अन्नसामग्री गोळा करून नगरोनगरी साठवून ठेवली; एकेका नगराच्या आसपासचे पीक त्याने त्या त्या नगरात साठवून ठेवले. योसेफाने समुद्राच्या वाळूसारखा धान्याचा महामूर संचय करून ठेवला; त्याने ते मोजायचे सोडले, कारण ते अगणित होते. दुष्काळ पडण्यापूर्वी ओन येथील याजक पोटीफरा ह्याची मुलगी आसनथ हिच्यापासून योसेफाला दोन मुलगे झाले. योसेफाने आपल्या पहिल्या मुलाचे नाव मनश्शे (विसर पाडणारा) असे ठेवले; “कारण” तो म्हणाला, “देवाने माझ्या सर्व क्लेशांचा व माझ्या पितृगृहाचा मला विसर पाडला आहे.” त्याने दुसर्याचे नाव एफ्राईम (फलद्रूप) असे ठेवले; “कारण” तो म्हणाला, “माझ्या विपत्तीच्या देशात देवाने मला फलद्रूप केले आहे.” मिसर देशातल्या सुकाळाची सात वर्षे संपली. मग योसेफाने सांगितल्याप्रमाणे दुष्काळाची सात वर्षे सुरू झाली, तेव्हा देशोदेशी दुष्काळ पडला, तथापि मिसर देशात सर्वत्र अन्न होते. अवघ्या मिसर देशाची उपासमार होऊन लोक फारोकडे अन्नासाठी ओरड करू लागले, तेव्हा फारो सर्व मिसरी लोकांना म्हणाला, “योसेफाकडे जा; तो तुम्हांला सांगेल ते करा.” दुष्काळाने सर्व पृथ्वी व्यापली, आणि मिसरात तो भारी कडक झाला. तेव्हा योसेफ सर्व कोठारे उघडून मिसरी लोकांना धान्य विकू लागला. तेव्हा देशोदेशीचे लोक धान्य विकत घेण्यासाठी मिसरात योसेफाकडे गेले, कारण सार्या पृथ्वीवर भारी कडक दुष्काळ पडला होता.
उत्पत्ती 41 वाचा
ऐका उत्पत्ती 41
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: उत्पत्ती 41:47-57
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ