मिसरी राजा फारो ह्याच्यापुढे योसेफ जाऊन उभा राहिला तेव्हा तो तीस वर्षांचा होता. मग योसेफ फारोसमोरून निघून सर्व देशात दौरा करू लागला. त्या सुकाळाच्या सात वर्षांत जमिनीस भरघोस पीक आले. त्याने ह्या सात वर्षांत मिसर देशातील सर्व प्रकारची अन्नसामग्री गोळा करून नगरोनगरी साठवून ठेवली; एकेका नगराच्या आसपासचे पीक त्याने त्या त्या नगरात साठवून ठेवले. योसेफाने समुद्राच्या वाळूसारखा धान्याचा महामूर संचय करून ठेवला; त्याने ते मोजायचे सोडले, कारण ते अगणित होते.
उत्पत्ती 41 वाचा
ऐका उत्पत्ती 41
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: उत्पत्ती 41:46-49
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ