YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 41:39-46

उत्पत्ती 41:39-46 MARVBSI

मग फारो योसेफाला म्हणाला, “देवाने तुला ह्या सर्व गोष्टींचे ज्ञान करून दिले आहे त्या अर्थी तुझ्यासारखा चतुर व शहाणा दुसरा कोणी नाही. तर तू माझ्या घराचा अधिकारी हो; तुझ्या आज्ञेप्रमाणे माझी सर्व प्रजा चालेल, राजासनापुरताच काय तो मी तुझ्यापेक्षा मोठा.” फारो योसेफाला आणखी म्हणाला, “हे पाहा, तुला मी अवघ्या मिसर देशावर नेमतो.” मग फारोने आपल्या बोटातील मुद्रिका काढून योसेफाच्या बोटात घातली, त्याला तलम तागाची वस्त्रे लेववली आणि त्याच्या गळ्यात सोन्याची कंठी घातली; मग त्याला आपल्या मागच्या रथात बसवले, आणि ‘मुजरा करा!’ असे ते त्याच्यापुढे ललकारत चालले. ह्या प्रकारे त्याने त्याला अवघ्या मिसर देशावर नेमले. फारो योसेफाला म्हणाला, “मी फारो खरा, पण तुझ्या हुकुमाशिवाय अवघ्या मिसर देशात कोणी हात किंवा पाय हलवणार नाही.” फारोने योसेफाचे नाव सापनाथ-पानेह असे ठेवले; आणि ओन येथील याजक पोटीफरा ह्याची मुलगी आसनथ ही त्याला बायको करून दिली. मग योसेफ मिसर देशात दौरा करू लागला. मिसरी राजा फारो ह्याच्यापुढे योसेफ जाऊन उभा राहिला तेव्हा तो तीस वर्षांचा होता. मग योसेफ फारोसमोरून निघून सर्व देशात दौरा करू लागला.