YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 37:5-11

उत्पत्ती 37:5-11 MARVBSI

योसेफाला एक स्वप्न पडले, ते त्याने त्यांना सांगितले तेव्हा तर ते त्याचा अधिकच द्वेष करू लागले. तो त्यांना म्हणाला, “मला पडलेले स्वप्न ऐका : पाहा, आपण शेतात पेंढ्या बांधत होतो तेव्हा माझी पेंढी उठून उभी राहिली; तेव्हा तुमच्या पेंढ्या माझ्या पेंढीसभोवती येऊन उभ्या राहिल्या व त्यांनी तिला नमन केले.” हे ऐकून त्याचे भाऊ त्याला म्हणाले, “काय, तू आमच्यावर राज्य करणार? तू आमच्यावर सत्ता चालवणार?” आणि त्याच्या स्वप्नांमुळे व भाषणामुळे तर ते त्याचा अधिकच द्वेष करू लागले. पुढे त्याला आणखी एक स्वप्न पडले, तेही त्याने आपल्या भावांना सांगितले, तो म्हणाला, “पाहा, मला आणखी एक स्वप्न पडले, ते असे की, सूर्य, चंद्र व अकरा तारे ह्यांनी मला नमन केले.” त्याने हे स्वप्न आपल्या बापाला व भावांना सांगितले. तेव्हा त्याचा बाप त्याला धमकावून म्हणाला, “हे कसले स्वप्न तुला पडले? काय, मी, तुझी आई व तुझे भाऊ हे भूमीपर्यंत लवून तुला नमन करण्यासाठी तुझ्यापुढे येणार?” त्याचे भाऊ त्याचा हेवा करू लागले, पण त्याचे म्हणणे बापाने मनात ठेवले. योसेफाला मिसर देशात विकून टाकतात