YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 32:13-21

उत्पत्ती 32:13-21 MARVBSI

त्या रात्री तो तेथेच राहिला; आणि आपल्याजवळ जे होते त्यातून त्याने आपला भाऊ एसाव ह्याच्यासाठी भेट तयार केली; दोनशे शेळ्या व वीस बोकड, दोनशे मेंढ्या व वीस एडके, तीस दुभत्या सांडणी व त्यांची पोरे, चाळीस गाई व दहा खोंड, वीस गाढवी व दहा शिंगरे, ह्या एवढ्यांचे त्याने वेगवेगळे कळप केले आणि एकेक आपल्या चाकरांच्या स्वाधीन करून त्यांना सांगितले, “तुम्ही कळपाकळपांत अंतर ठेवून माझ्यापुढे चालू लागा.” त्याने सर्वांत पुढच्या चाकराला सांगितले की, “माझा भाऊ एसाव तुला भेटेल व विचारील की तू कोणाचा? कोठे चाललास? आणि ही हाकून नेत आहेस ती कोणाची?” तेव्हा त्याला सांग की, आपला सेवक याकोब ह्याची ही आहेत; ही त्याने आपला स्वामी एसाव ह्याला भेट म्हणून पाठवली आहेत; पाहा, तोही मागाहून येत आहे.” मग दुसर्‍याला, तिसर्‍याला आणि इतर सर्व कळप हाकून नेणार्‍यांना अशीच आज्ञा करून त्याने म्हटले की, “तुम्हांला एसाव भेटला तर असेच बोला, आणि सांगा, तुझा दास याकोब हाही मागाहून येत आहे.” याकोबाला वाटले की, पुढे भेट पाठवून त्याला शांत केले व मागाहून त्याचे दर्शन घेतले तर तो आपला अंगीकार करील. ह्याप्रमाणे त्याची ती भेट पुढे गेली व तो त्या रात्री तळावर राहिला.