एज्रा 2
2
परत आलेल्या लोकांची यादी
(नहे. 7:5-73)
1बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याने जे लोक पाडाव करून बाबेलास नेले होते त्यांतले त्या मुलखात राहणारे बंधमुक्त होऊन यरुशलेमास व यहूदातील आपापल्या नगरी परत गेले ते हे :
2जरूब्बाबेलबरोबर आले ते येशूवा, नहेम्या, सराया, रएलाया, मर्दखय, बिलशान, मिस्पार, बिग्वई, रहूम, बाना. इस्राएल लोकांतल्या मनुष्यांची ही मोजदाद आहे : 3पारोशाचे वंशज दोन हजार एकशे बाहत्तर, 4शफाट्याचे वंशज तीनशे बाहत्तर, 5आरहाचे वंशज सातशे पंचाहत्तर, 6पहथ-मवाबाचे वंशज, येशूवा व यवाब ह्यांच्या कुळातले दोन हजार आठशे बारा, 7एलामाचे वंशज एक हजार दोनशे चौपन्न,
8जत्तूचे वंशज नऊशे पंचेचाळीस, 9जक्काईचे वंशज सातशे साठ,
10बानीचे वंशज सहाशे बेचाळीस,
11बेबाईचे वंशज सहाशे तेवीस,
12अजगादाचे वंशज एक हजार दोनशे बावीस,
13अदोनीकामाचे वंशज सहाशे सहासष्ट,
14बिग्वईचे वंशज दोन हजार छप्पन्न,
15आदीनाचे वंशज चारशे चौपन्न,
16हिज्कीयाच्या वंशातला आटेर ह्याच्या कुळातले अठ्ठ्याण्णव,
17बेसाईचे वंशज तीनशे तेवीस,
18योराचे लोक एकशे बारा,
19हाशूमाचे लोक दोनशे तेवीस,
20गिबाराचे लोक पंचाण्णव,
21बेथलेहेमाचे लोक एकशे तेवीस,
22नटोफाचे लोक छप्पन्न,
23अनाथोथचे लोक एकशे अठ्ठावीस,
24अजमावेथाचे लोक बेचाळीस,
25किर्याथ-यारीम, कफीरा व बैरोथ ह्यांतले लोक सातशे त्रेचाळीस,
26रामा व गेबा ह्यांतले लोक सहाशे एकवीस,
27मिखमासाचे लोक एकशे बावीस,
28बेथेल व आय ह्यांतले लोक दोनशे तेवीस,
29नबोचे लोक बावन्न,
30मग्वीशचे वंशज एकशे छप्पन्न,
31दुसर्या एलामाचे वंशज एक हजार दोनशे चोपन्न,
32हारीमाचे वंशज तीनशे वीस,
33लोद-हादीद व ओनो ह्यांतले लोक सातशे पंचवीस,
34यरीहोचे लोक तीनशे पंचेचाळीस,
35सनाहचे लोक तीन हजार सहाशे तीस,
36याजकांपैकी : येशूवाच्या घराण्यातले यदायाचे वंशज नऊशे बाहत्तर,
37इम्मेराचे वंशज एक हजार बावन्न,
38पशहूराचे वंशज एक हजार दोनशे सत्तेचाळीस,
39हारीमाचे वंशज एक हजार सतरा,
40लेव्यांपैकी : होदव्याच्या वंशापैकी येशूवा व कदमीएल ह्यांच्या वंशातले चौर्याहत्तर,
41गायकांपैकी आसाफाच्या वंशातले एकशे अठ्ठावीस,
42द्वारपालांपैकी : शल्लूमाचे वंशज, आहेराचे वंशज, तल्मोनाचे वंशज, अक्कूबाचे वंशज, हतीताचे वंशज, व शोबाईचे वंशज हे सर्व मिळून एकशे एकोणचाळीस,
43नथीनीमांपैकी : सीहाचे वंशज, हसूफाचे वंशज, तब्बावोथाचे वंशज,
44केरोसाचे वंशज, सीहाचे वंशज, पादोनाचे वंशज,
45लबानाचे वंशज, हगबाचे वंशज, अकूबाचे वंशज,
46हागाबाचे वंशज, शम्लाईचे वंशज, हानानाचे वंशज,
47गिद्देलाचे वंशज, गहराचे वंशज, रायाचे वंशज,
48रसीनाचे वंशज, नकोदाचे वंशज, गज्जामाचे वंशज,
49उज्जाचे वंशज, पासेहाचे वंशज, बेसाईचे वंशज,
50अस्नाचे वंशज, मऊनीमाचे वंशज, नफ्सीमाचे वंशज,
51बकबुकाचे वंशज, हकूफाचे वंशज, हर्हूराचे वंशज,
52बस्लूथाचे वंशज, महिदाचे वंशज, हर्षाचे वंशज,
53बर्कोसाचे वंशज, सीसराचे वंशज, तामहाचे वंशज,
54नसीहाचे वंशज, हतिफाचे वंशज,
55शलमोनाच्या चाकरांचे वंशज, सोताईचे वंशज, हसोफरताचे वंशज, परूदाचे वंशज,
56जालाचे वंशज, दर्कोनाचे वंशज, गिद्देलाचे वंशज,
57शफाट्याचे वंशज, हत्तीलाचे वंशज, पोखेरेथ-हस्सबाईमाचे वंशज, आमीचे वंशज,
58सर्व नथीनीम व शलमोनाच्या चाकरांचे वंशज हे सगळे मिळून तीनशे ब्याण्णव होते.
59तेल्मेलह, तेल्हर्षा, करूब, अद्दान व इम्मेर येथून जे वर आले ते हेच होते, परंतु ते इस्राएलातले होते किंवा नाही ह्याविषयी आपापली पितृकुळे व आपापली वंशावळी त्यांना दाखवता आली नाही.
60दलायाचे वंशज, तोबियाचे वंशज, नकोदाचे वंशज सहाशे बावन्न;
61आणि याजकांच्या कुळांपैकी : हबयाचे वंशज, हक्कोसाचे वंशज, बर्जिल्लयाचे वंशज, त्याने बर्जिल्लय गिलादाच्या एका कन्येशी विवाह केला, त्यावरून त्याला त्यांचे नाव पडले.
62ह्या सर्वांनी आपापल्या वंशावळींचा लेख ज्यांची वंशावळी नोंदली होती त्यांच्या वहीत शोधला पण त्यांना तो न मिळाल्यामुळे ते अशुद्ध ठरून याजकपदावरून भ्रष्ट झाले.
63तिर्शाथा1 त्यांना म्हणाला, “उरीम व थुम्मीम धारण करणार्या याजकाची स्थापना होईपर्यंत तुम्ही कोणी परमपवित्र पदार्थ खाण्यास पात्र नाही.”
64ही सारी मंडळी मिळून एकंदर बेचाळीस हजार तीनशे साठ होती;
65ह्याशिवाय त्यांचे सात हजार तीनशे सदतीस दास व दासी आणि दोनशे गाणारे व गाणार्या होत्या.
66त्यांची घोडी सातशे छत्तीस, त्यांची खेचरे दोनशे पंचेचाळीस,
67त्यांचे उंट चारशे पस्तीस व त्यांची गाढवे सहा हजार सातशे वीस होती.
68पितृकुळातील कित्येक प्रमुख पुरुष यरुशलेमेतील परमेश्वराच्या मंदिराकडे आले तेव्हा देवाचे मंदिर पूर्ववत उभे करण्यासाठी त्यांनी स्वखुशीने अर्पणे दिली;
69त्यांनी आपल्या शक्तीनुसार एकसष्ट हजार दारिक1 सोने पाच हजार माने1 चांदी आणि शंभर याजकीय वस्त्रे भांडारात पावती केली.
70ह्या प्रकारे याजक, लेवी, कित्येक सामान्य लोक, गायक, द्वारपाळ आणि नथीनीम हे आपापल्या नगरात राहिले; असे सर्व इस्राएल आपापल्या नगरात पुन्हा वस्ती करून राहिले.
सध्या निवडलेले:
एज्रा 2: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.