YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहेज्केल 48

48
1आता वंशांची नावे ही : उत्तरेच्या सीमेपासून हेथलोनच्या रस्त्याकडील हमाथाच्या घाटाचा रस्ता, दिमिष्काच्या सरहद्दीवरले हसर-एनान, ह्या पूर्व-पश्‍चिम सीमा असलेला प्रदेश, हमाथाला लागून असलेला जो उत्तरेकडील प्रदेश तो दानाचा विभाग.
2दानाच्या सरहद्दीस लागून असलेला जो पूर्वपश्‍चिम प्रदेश तो आशेराचा विभाग.
3आशेराच्या सरहद्दीस लागून असलेला जो पूर्वपश्‍चिम प्रदेश तो नफतालीचा विभाग.
4नफतालीच्या सरहद्दीस लागून असलेला जो पूर्वपश्‍चिम प्रदेश तो मनश्शेचा विभाग.
5मनश्शेच्या सरहद्दीस लागून असलेला जो पूर्वपश्‍चिम प्रदेश तो एफ्राइमाचा विभाग.
6एफ्राइमाच्या सरहद्दीस लागून असलेला जो पूर्वपश्‍चिम प्रदेश तो रऊबेनाचा विभाग.
7रऊबेनाच्या सरहद्दीस लागून असलेला जो पूर्वपश्‍चिम प्रदेश तो यहूदाचा विभाग.
8यहूदाच्या सरहद्दीस लागून असलेला जो पूर्वपश्‍चिम प्रदेश पंचवीस हजार हात1 रुंद व इतर वंशांच्या विभागांइतका पूर्वपश्‍चिम लांब तो समर्पित अंश म्हणून अर्पण कराल त्यामध्ये पवित्रस्थान असणार.
9परमेश्वराला जो समर्पित अंश म्हणून अर्पण कराल तो पंचवीस हजार हात लांब व दहा हजार हात रुंद असावा.
10हा समर्पित अंश याजकांचा; हा उत्तरेस पंचवीस हजार हात लांब, पश्‍चिमेस दहा हजार हात रुंद, पूर्वेस दहा हजार हात रुंद, व दक्षिणेस पंचवीस हजार हात लांब असावा; परमेश्वराचे पवित्रस्थान ह्यामध्ये असणार.
11याजकांपैकी जे सादोकवंशज पवित्र केले आहेत, ज्यांनी माझे नियम पाळले आहेत, व जे लेव्यांप्रमाणे इस्राएल वंशजांबरोबर बहकले नाहीत,
12त्यांना देशातील समर्पित अंशातला एक अंश, म्हणजे अर्थात लेव्यांच्या विभागांतला एक परमपवित्र विभाग द्यावा;
13आणि याजकांच्या विभागास लागून पंचवीस हजार हात लांब व दहा हजार हात रुंद असा विभाग लेव्यांना मिळावा; त्याची सबंध लांबी पंचवीस हजार हात व रुंदी दहा हजार हात असावी.
14त्यांनी त्यातला काही विकू नये व त्याची अदलाबदल करू नये; तसेच देशातील प्रथमफळे इतरांकडे जाऊ देऊ नयेत; कारण तो भाग परमेश्वराला पवित्र आहे.
15त्या पंचवीस हजार हात लांबीच्या प्रदेशापैकी जो पाच हजार हात रुंदीचा भाग राहील तो नगरासाठी सार्वजनिक असून तो वस्तीसाठी व बखळीसाठी सोडावा; त्याच्यामध्ये नगर वसवावे.
16त्याचे माप असे असावे : उत्तर बाजू साडेचार हजार हात, दक्षिण बाजू साडेचार हजार हात, पूर्व बाजू साडेचार हजार हात व पश्‍चिम बाजू साडेचार हजार हात.
17नगराची बखळ उत्तरेस अडीचशे हात, दक्षिणेस अडीचशे हात, पूर्वेस अडीचशे हात, व पश्‍चिमेस अडीचशे हात असावी.
18ह्या समर्पित प्रदेशाला लागून उरलेला जो प्रदेश त्याच्या उत्पन्नाने नगरातील कामधंदा करणार्‍यांचे पोषण व्हावे
19इस्राएलच्या सर्व वंशांतील कामधंदा करणार्‍या नगरातल्या लोकांनी त्या भागाची मशागत करावी.
20सगळे समर्पित क्षेत्र पंचवीस हजार हात लांब व पंचवीस हजार हात रुंद असावे; ह्या पवित्र समर्पित अंशाचा चतुर्थांश नगराच्या वतनासाठी द्यावा.
21तो समर्पित भाग व नगराचे वतन ह्यांच्या अलीकडे-पलीकडे उरलेला भाग अधिपतीचा असावा; वंशाना दिलेल्या भागांना लागून पंचवीस हजार हात समर्पित जागेच्या पूर्व सीमेवर, तसेच पंचवीस हजार हात जागेच्या पश्‍चिम सीमेवर असलेले भाग अधिपतीचे असावेत; समर्पित भाग व मंदिराचे पवित्रस्थान हे त्या दोहो भागांच्या मध्ये असावेत.
22ह्या प्रकारे लेव्यांचे वतन व नगराचे वतन ही अधिपतीच्या वतनाच्यामध्ये आहेत; हे अधिपतीचे वतन यहूदा प्रांत व बन्यामीन प्रांत ह्यांच्या दरम्यान आहे; हा भाग अधिपतीचा होय.
23वरकड वंशांचा भाग पूर्वपश्‍चिम आहे; त्यांतला एक बन्यामिनाचा विभाग.
24बन्यामिनाच्या सरहद्दीला लागून असलेला पूर्वपश्‍चिम प्रदेश तो शिमोनाचा विभाग.
25शिमोनाच्या सरहद्दीला लागून असलेला पूर्वपश्‍चिम प्रदेश तो इस्साखाराचा विभाग.
26इस्साखाराच्या सरहद्दीला लागून असलेला पूर्वपश्‍चिम प्रदेश तो जबुलूनाचा विभाग.
27जबुलूनाच्या सरहद्दीला लागून असलेला पूर्वपश्‍चिम प्रदेश तो गादाचा विभाग.
28दक्षिणेस गादाची सरहद्द तामारपासून मरीबथ-कादेश येथील पाण्यापर्यंत व मिसर देशाच्या नाल्याच्या बाजूने थेट मोठ्या समुद्रापर्यंत.
29ही भूमी तुम्ही चिठ्ठ्या टाकून इस्राएलच्या वंशांना वतनासाठी वाटून द्यावी; हे त्यांचे विभाग आहेत, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
नगराच्या वेशी व त्यांची नावे
30उत्तर दिशेस नगराबाहेरील रहदारीच्या क्षेत्राचे माप साडेचार हजार हात असावे.
31नगराच्या वेशी इस्राएल वंशांच्या नावांप्रमाणे असाव्यात : उत्तरेकडे तीन वेशी असाव्यात - रऊबेन वेस, यहूदा वेस व लेवी वेस.
32पूर्व दिशेच्या रहदारीच्या क्षेत्राचे माप साडेचार हजार हात असावे; तेथे तीन वेशी असाव्यात : योसेफ वेस, बन्यामीन वेस व दान वेस.
33दक्षिण दिशेच्या रहदारीच्या क्षेत्राचे माप साडेचार हजार हात असावे; तेथेही तीन वेशी असाव्यात : शिमोन वेस, इस्साखार वेस व जबुलून वेस.
34पश्‍चिम दिशेच्या रहदारीच्या क्षेत्राचे माप साडेचार हजार हात असावे; तेथेही तीन वेशी असाव्यात : गाद वेस, आशेर वेस व नफताली वेस.
35ह्या प्रकारे रहदारीचे एकंदर क्षेत्र अठरा हजार हात असावे; ह्या नगराचे नाव येथून पुढे याव्हे-शाम्मा (तेथे परमेश्वर आहे) असे पडेल.”

सध्या निवडलेले:

यहेज्केल 48: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन