आमच्या बंदिवासाच्या पंचविसाव्या वर्षी, म्हणजे नगराचा विध्वंस झाल्यावर चौदाव्या वर्षी, वर्षारंभाच्या महिन्याच्या दशमीसच परमेश्वराचा वरदहस्त माझ्यावर आला व त्याने मला तेथे नेले. त्याने दिव्य दृष्टान्ताच्या द्वारे मला इस्राएल देशात नेऊन एका अतिशय उंच पर्वतावर ठेवले; त्यावर दक्षिणेस नगराच्या आकारासारखे काही होते. त्याने मला त्या जागी नेले तेव्हा एक पुरुष दिसला; त्याचे स्वरूप पितळेसारखे होते; त्याच्या हातात तागाची एक दोरी व मापण्याची काठी होती; तो वेशीनजीक उभा होता. तो पुरुष मला म्हणाला, “मानवपुत्रा, आपल्या डोळ्यांनी पाहा, आपल्या कानांनी ऐक, व मी तुला जे काही दाखवतो त्या सर्वांकडे चित्त लाव; हे तुला दाखवावे म्हणून मी तुला इकडे आणले आहे; तू जे पाहशील ते सर्व इस्राएल घराण्यास सांग.” मी पाहिले तर त्या मंदिराभोवती एक तट होता; त्या पुरुषाच्या हातात मापण्याची एक काठी होती; ती सहा हात लांबीची होती; हे माप एक हात व चार अंगुळे होते. त्याने त्या इमारतीच्या भिंतीची जाडी एक काठी व उंची एक काठी मापली. तो पूर्वाभिमुख असलेल्या द्वाराकडे जाऊन पायर्या चढून वर गेला; त्याने द्वाराचा उंबरठा एक काठी रुंद मापला; हा पहिला उंबरठा एक काठी भरला.
यहेज्केल 40 वाचा
ऐका यहेज्केल 40
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: यहेज्केल 40:1-6
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ