YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहेज्केल 37:3-7

यहेज्केल 37:3-7 MARVBSI

मग तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, ह्या अस्थी सजीव होतील काय?” मी म्हणालो, “प्रभू परमेश्वरा, हे तुलाच ठाऊक.” तेव्हा तो मला म्हणाला, “ह्या अस्थींविषयी संदेश देऊन त्यांना म्हण, शुष्क अस्थींनो, परमेश्वराचे वचन ऐका : प्रभू परमेश्वर ह्या अस्थींना म्हणतो, पाहा, मी तुमच्यात श्वास घालतो म्हणजे तुम्ही सजीव व्हाल. मी तुम्हांला स्नायू लावीन, तुमच्यावर मांस चढवीन, तुम्हांला त्वचेने आच्छादीन, तुमच्यात श्वास घालीन, म्हणजे तुम्ही सजीव व्हाल आणि तुम्हांला समजेल की मी परमेश्वर आहे.” मला आज्ञा झाली त्याप्रमाणे मी संदेश दिला; मी संदेश देत असता आवाज झाला; आणि पाहा, भूकंप होऊन अस्थींना अस्थी लागून जडल्या.