परमेश्वराचा वरदहस्त माझ्यावर आला; आणि परमेश्वराच्या आत्म्याला स्फूर्ती होऊन त्याने मला उचलले व खोर्यात नेऊन ठेवले, तेथे अस्थीच अस्थी होत्या. त्याने मला त्यांच्यामधून चोहोकडून फिरवले तेव्हा पाहा, त्या खोर्याच्या जमिनीवर पुष्कळ अस्थी होत्या; त्या अति शुष्क होत्या. मग तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, ह्या अस्थी सजीव होतील काय?” मी म्हणालो, “प्रभू परमेश्वरा, हे तुलाच ठाऊक.” तेव्हा तो मला म्हणाला, “ह्या अस्थींविषयी संदेश देऊन त्यांना म्हण, शुष्क अस्थींनो, परमेश्वराचे वचन ऐका : प्रभू परमेश्वर ह्या अस्थींना म्हणतो, पाहा, मी तुमच्यात श्वास घालतो म्हणजे तुम्ही सजीव व्हाल. मी तुम्हांला स्नायू लावीन, तुमच्यावर मांस चढवीन, तुम्हांला त्वचेने आच्छादीन, तुमच्यात श्वास घालीन, म्हणजे तुम्ही सजीव व्हाल आणि तुम्हांला समजेल की मी परमेश्वर आहे.” मला आज्ञा झाली त्याप्रमाणे मी संदेश दिला; मी संदेश देत असता आवाज झाला; आणि पाहा, भूकंप होऊन अस्थींना अस्थी लागून जडल्या.
यहेज्केल 37 वाचा
ऐका यहेज्केल 37
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: यहेज्केल 37:1-7
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ