प्रभू परमेश्वर सोरेस म्हणतो, तुझ्या पतनाच्या आवाजाने, जखमी झालेल्यांच्या कण्हण्याने, तुझ्यामध्ये चाललेल्या कत्तलीने द्वीपांचा थरकाप होणार नाही का? तेव्हा सर्व दर्यावर्दी सरदार आपापल्या आसनांवरून उतरून खाली येतील, आपले झगे काढून ठेवतील, आपली जरतारी वस्त्रे काढून टाकतील; ते भीतिरूप वस्त्रे धारण करून जमिनीवर बसतील, क्षणोक्षणी त्यांचा थरकाप होईल व तुझ्याविषयी ते विस्मय पावतील. ते तुझ्याविषयी शोक करून म्हणतील, ‘अगे कीर्तिमान नगरी, तू जशी काय समुद्रातून उद्भवून बसली होतीस, तू समुद्रावर पराक्रमी होतीस, तू व तुझे रहिवासी ह्यांचा तेथील सर्व लोकांना वचक असे, ती तू कशी नष्ट झालीस! तुझ्या पतनदिनी द्वीपांचा थरकाप होत आहे! तुझ्या निघून जाण्याने समुद्रातील द्वीपे भयचकित झाली आहेत.’ प्रभू परमेश्वर म्हणतो, मी तुला निर्जन झालेल्या नगरांप्रमाणे ओसाड नगरी करीन व तुझ्यावर खोल सागराचा लोट आणून प्रचंड जलप्रवाहांनी तुला व्यापून टाकीन, तेव्हा गर्तेत गेलेल्या प्राचीन काळच्या लोकांकडे तुला खाली टाकून गर्तेत गेलेल्यांबरोबर प्राचीन काळापासून ओसाड असलेल्या स्थानांत पृथ्वीच्या अधोभागी तुला राहायला लावीन म्हणजे तू पुन्हा वसणार नाहीस; पण मी जिवंतांच्या भूमीला वैभव देईन. लोकांना दहशत पडेल असा तुझा मी विध्वंस करीन, तू नाहीशी होशील; तुझा शोध करतील तरी तू कधीही सापडणार नाहीस, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”
यहेज्केल 26 वाचा
ऐका यहेज्केल 26
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: यहेज्केल 26:15-21
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ