त्याने शुद्ध सोन्याचा एक दीपवृक्ष बनवला. हा दीपवृक्ष, त्याची बैठक, त्याचा दांडा, त्याच्या वाट्या, त्याची बोंडे व त्याची फुले ही सर्व एकाच अखंड तुकड्याची घडवली. ह्या दीपवृक्षाला सहा शाखा होत्या; एका बाजूला तीन शाखा व दुसर्या बाजूला तीन शाखा; प्रत्येक शाखेला बदामाच्या फुलांसारख्या तीन-तीन वाट्या बोंडाफुलांसह केल्या. आणि दुसर्या बाजूच्या त्याच्या जोडीच्या प्रत्येक शाखेलाही बदामाच्या फुलांसारख्या तीन-तीन वाट्या बोंडाफुलांसह केल्या; दीपवृक्षामधून निघालेल्या सहा शाखांची रचना अशीच होती. दीपवृक्षाच्या दांड्याला बदामाच्या फुलांसारख्या बोंडाफुलांसह चार वाट्या होत्या. दीपवृक्षामधून निघणार्या सहा शाखांपैकी दोन-दोन शाखा आणि त्याच्या खाली असलेले एकेक बोंड ही एकाच अखंड तुकड्यांची होती. बोंडे व शाखा ही सर्व अखंड असून तो सबंध दीपवृक्ष शुद्ध सोन्याचा एकच घडीव तुकडा केला. त्याने त्या दीपवृक्षाचे सात दिवे, त्याचे चिमटे व ताटल्या शुद्ध सोन्याच्या केल्या. त्याने तो दीपवृक्ष व त्याची सर्व उपकरणे एक किक्कार शुद्ध सोन्याची केली. मग त्याने बाभळीच्या लाकडांची धूपवेदी केली; तिची लांबी एक हात व रुंदी एक हात अशी ती चौरस होती. तिची उंची दोन हात होती व तिची शिंगे अंगचीच होती. त्याने त्या वेदीचा वरचा भाग, तिच्या चार्ही बाजू व तिची शिंगे शुद्ध सोन्याने मढवली आणि तिला सभोवती सोन्याचा कंगोरा केला. वेदी उचलून नेण्याचे दांडे घालता येण्यासाठी त्याने सोन्याच्या कड्या करून त्या कंगोर्याच्या खाली तिच्या दोन्ही अंगांना, दोन कोनांस दोन-दोन अशा लावल्या. त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे करून ते सोन्याने मढवले. त्याने अभिषेकाचे पवित्र तेल आणि सुगंधी द्रव्ययुक्त शुद्ध धूप गांधी बनवतात तसा बनवला.
निर्गम 37 वाचा
ऐका निर्गम 37
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: निर्गम 37:17-29
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ