नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “मी फारोवर आणि मिसर देशावर आणखी एक पीडा आणीन, त्यानंतर तो तुम्हांला येथून जाऊ देईल; आणि तो जाऊ देताना तुम्हांला येथून कायमचे घालवून देईल. तू लोकांना सांगून ठेव की, प्रत्येक पुरुषाने आपल्या शेजार्यापासून व प्रत्येक स्त्रीने आपल्या शेजारणीपासून सोन्याचांदीचे दागिने मागून घ्यावेत.” अशा प्रकारे मिसरी लोकांची इस्राएल लोकांवर कृपादृष्टी होईल असे परमेश्वराने केले. शिवाय मिसर देशात फारोचे सेवक व सामान्य लोक ह्यांच्या दृष्टीने मोशे हा पुरुष अति थोर होता. मग मोशे म्हणाला, “परमेश्वर असे म्हणतो की, आज मध्यरात्रीच्या सुमारास मी मिसर देशामधून फिरेन. तेव्हा मिसराच्या सिंहासनावर बसणार्या फारोपासून ते जात्यावर बसणार्या दासीपर्यंत सर्वांचे ज्येष्ठ पुत्र व गुरांचेही प्रथमवत्स मरतील. पूर्वी कधी झाला नव्हता आणि पुढे कधी होणार नाही असा मोठा हाहाकार मिसर देशभर उडेल.
निर्गम 11 वाचा
ऐका निर्गम 11
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: निर्गम 11:1-6
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ