YouVersion लोगो
सर्च आयकॉन

निर्गम 11:1-6

निर्गम 11:1-6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “मी फारोवर आणि मिसर देशावर आणखी एक पीडा आणीन, त्यानंतर तो तुम्हांला येथून जाऊ देईल; आणि तो जाऊ देताना तुम्हांला येथून कायमचे घालवून देईल. तू लोकांना सांगून ठेव की, प्रत्येक पुरुषाने आपल्या शेजार्‍यापासून व प्रत्येक स्त्रीने आपल्या शेजारणीपासून सोन्याचांदीचे दागिने मागून घ्यावेत.” अशा प्रकारे मिसरी लोकांची इस्राएल लोकांवर कृपादृष्टी होईल असे परमेश्वराने केले. शिवाय मिसर देशात फारोचे सेवक व सामान्य लोक ह्यांच्या दृष्टीने मोशे हा पुरुष अति थोर होता. मग मोशे म्हणाला, “परमेश्वर असे म्हणतो की, आज मध्यरात्रीच्या सुमारास मी मिसर देशामधून फिरेन. तेव्हा मिसराच्या सिंहासनावर बसणार्‍या फारोपासून ते जात्यावर बसणार्‍या दासीपर्यंत सर्वांचे ज्येष्ठ पुत्र व गुरांचेही प्रथमवत्स मरतील. पूर्वी कधी झाला नव्हता आणि पुढे कधी होणार नाही असा मोठा हाहाकार मिसर देशभर उडेल.

सामायिक करा
निर्गम 11 वाचा

निर्गम 11:1-6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “मी फारोवर व मिसरावर आणखी एक पीडा आणीन. त्यानंतर फारो तुम्हास येथून जाऊ देईल; तो तुम्हास जाऊ देईल तेव्हा तो तुम्हास सर्वस्वी ढकलून काढून लावील, तू लोकांच्या कानांत सांगून ठेव की, प्रत्येक पुरुषाने आपल्या शेजाऱ्यापासून व प्रत्येक स्त्रीने आपल्या शेजारणीपासून सोन्याचांदीचे दागिने मागून घ्यावे.” मिसरी लोकांची इस्राएली लोकांवर कृपादृष्टी होईल असे परमेश्वराने केले. मिसराचे सर्व लोक आणि फारोचे सेवक यांच्या दृष्टीने मोशे फार महान पुरुष होता. मोशे लोकांस म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, मध्यरात्री मी मिसरातून फिरेन आणि तेव्हा मिसराच्या सिंहासनावर विराजमान असलेल्या फारोपासून तो जात्यावर बसणाऱ्या दासीपर्यंत सर्वांचे ज्येष्ठ पुत्र व गुरांचे प्रथम वत्सदेखील मरतील. मिसर देशात पूर्वी कधीही झाला नव्हता आणि भविष्यात कधीही होणार नाही असा मोठा आकांत होईल.

सामायिक करा
निर्गम 11 वाचा