शेवटी, माझ्या बंधूंनो, प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्यात बलवान होत जा. सैतानाच्या डावपेचांपुढे तुम्हांला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामग्री धारण करा. कारण आपले झगडणे रक्तमांसाबरोबर नव्हे, तर सत्तांबरोबर, अधिकार्यांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर, आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे. ह्या कारणास्तव तुम्हांला वाईट दिवसांत प्रतिकार करता यावा व सर्वकाही केल्यावर टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामग्री घ्या. तर मग आपली कंबर सत्याने कसा; नीतिमत्त्वाचे उरस्त्राण धारण करा; शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता पायी चढवा, आणि ह्या सर्वांबरोबरच जिच्या योगे त्या दुष्टाचे सगळे जळते बाण तुम्हांला विझवता येतील, ती विश्वासाची ढाल हाती घ्या व उभे राहा. तारणाचे शिरस्त्राण व आत्म्याची तलवार म्हणजे देवाचे वचन, ही घ्या. सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी करा, सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा, आणि ह्या कामी पूर्ण तत्परतेने व सर्व पवित्र जनांसाठी विनवणी करत जागृत राहा. माझ्यासाठीही विनवणी करा की, ज्या सुवार्तेपायी बेड्या पडलेला मी वकील आहे तिचे रहस्य उघडपणे कळवण्या-साठी मी तोंड उघडीन तेव्हा मला शब्द सुचावेत, ह्यासाठी की, जसे बोलायला हवे, तसे मला उघडपणे बोलता यावे. माझे कसे काय चालले आहे हे तुम्हांलाही समजावे म्हणून प्रिय बंधू व प्रभूमध्ये विश्वासू सेवक जो तुखिक तो तुम्हांला सर्वकाही कळवील. आमची खुशाली तुम्हांला कळावी व त्याने तुमच्या अंत:करणाचे समाधान करावे ह्याकरताच मी त्याला तुमच्याकडे पाठवले आहे. देवपिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्यापासून बंधूंना शांती व विश्वासाबरोबर प्रीती लाभो. आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर जे अक्षय प्रीती करणारे आहेत त्या सर्वांबरोबर कृपा असो.
इफिसकरांस पत्र 6 वाचा
ऐका इफिसकरांस पत्र 6
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: इफिसकरांस पत्र 6:10-24
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ