परंतु पवित्र जनांना शोभते त्याप्रमाणे, जारकर्म, सर्व प्रकारची अशुद्धता व लोभ ह्यांचे तुमच्यामध्ये नावसुद्धा निघू नये. तसेच अमंगळपण, बाष्कळ गोष्टी व टवाळी ह्यांचाही उच्चार न होवो, ती उचित नाहीत; तर त्यापेक्षा उपकारस्तुती होवो. जारकर्मी, अशुद्ध कृती करणारा किंवा लोभी (हा मूर्तिपूजक आहे), असल्या कोणालाही ख्रिस्ताच्या व देवाच्या राज्यात वारसा नाही हे तुम्ही जाणूनच आहात. पोकळ भाषणाने कोणी तुम्हांला फसवू नये; कारण अशा गोष्टींमुळे आज्ञा मोडणार्या लोकांवर देवाचा कोप होतो. म्हणून तुम्ही त्यांचे भागीदार होऊ नका; कारण पूर्वी तुम्ही अंधकार असे होता, पण आता तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश असे आहात; प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला; (कारण प्रकाशाचे फळ1 सर्व प्रकारचे चांगुलपण, नीतिमत्त्व व सत्यता ह्यांत दिसून येते.) प्रभूला काय संतोषकारक2 आहे हे पारखून घेत जा. अंधाराच्या निष्फळ कर्माचे भागीदार होऊ नका, तर उलट त्यांचा निषेध करा; कारण त्या लोकांच्या हातून जी कर्मे गुप्तपणे होतात त्यांचा उच्चार करणेदेखील लज्जास्पद आहे. सर्व निषेधलेल्या गोष्टी उजेडाकडून उघड होतात, कारण जे काही उघड होते ते प्रकाश आहे. म्हणून तो म्हणतो,1 “हे निद्रिस्ता, जागा हो व मेलेल्यांतून ऊठ. म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल.”2
इफिसकरांस पत्र 5 वाचा
ऐका इफिसकरांस पत्र 5
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: इफिसकरांस पत्र 5:3-14
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ