YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उपदेशक 1:13-18

उपदेशक 1:13-18 MARVBSI

ह्या भूतलावर जे काही व्यापार चाललेले असतात त्यांचा नीट शोध करून ज्ञानाच्या योगाने त्यांचे रहस्य पाहण्याकडे मी आपले चित्त लावले. देवाने मानवपुत्रांच्या मागे बिकट कष्ट लावून दिले आहेत. ह्या भूतलावर जी काही कामे चालत असतात ती मी पाहिली; आणि पाहा, हा सर्व व्यर्थ, वायफळ उद्योग होय. जे वाकडे आहे ते सरळ होत नाही; जे उणे आहे ते जमेस धरता येत नाही. मी आपल्या मनाशी म्हणालो, “माझ्यापूर्वी जितके राजे यरुशलेमेवर होऊन गेले तितक्यांहून अधिक ज्ञान मी प्राप्त करून घेतले आहे; ज्ञान व विद्या ह्यांची पूर्ण प्रतीती माझ्या मनाला घडली आहे.” ज्ञान काय आणि वेडेपण व मूर्खपण ही काय हे जाणण्याकडे मी आपले चित्त लावले, तेव्हा मला असे दिसून आले की, हाही वायफळ उद्योग होय. कारण जेथे ज्ञान फार तेथे खेदही फार; ज्याला विद्या अधिक त्याला दु:खही अधिक.