उपर्याच्या अथवा अनाथाच्या मुकदम्याचा निवाडा विपरीत करू नकोस; विधवेचे वस्त्र गहाण ठेवून घेऊ नकोस, तू मिसर देशात दास होतास आणि तुझा देव परमेश्वर ह्याने तुला तेथून सोडवले ह्याची आठवण ठेव; म्हणूनच असे वागण्याची मी तुला आज्ञा देत आहे. तू आपल्या शेतातील पीक कापशील तेव्हा जर शेतात एखादी पेंढी चुकून राहिली तर ती आणायला परत जाऊ नकोस; उपरे, अनाथ व विधवा ह्यांच्यासाठी ती राहू दे, म्हणजे तुझा देव परमेश्वर तुझ्या हातच्या सर्व कामात तुला आशीर्वाद देईल. तू आपला जैतुनवृक्ष झोडशील तेव्हा एकदा झोडलेली फांदी पुन्हा झोडू नकोस; ती उपरे, अनाथ व विधवा ह्यांच्यासाठी असू दे. आपल्या द्राक्षमळ्यातली द्राक्षे खुडशील तेव्हा राहिलेली पुन्हा तोडू नकोस; ती उपरे, अनाथ व विधवा ह्यांच्यासाठी असू दे. तू मिसर देशात दास होतास ह्याची आठवण ठेव; म्हणूनच असे वागण्याची मी तुला आज्ञा करीत आहे.
अनुवाद 24 वाचा
ऐका अनुवाद 24
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: अनुवाद 24:17-22
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ