YouVersion लोगो
सर्च आयकॉन

अनुवाद 14

14
मयतासाठी दु:खप्रदर्शन करण्याच्या प्रथेला मनाई
1तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याची मुले आहात. मृतासाठी आपल्या अंगावर वार करून घेऊ नका किंवा मुंडण करून घेऊ नका, 2कारण तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याची पवित्र प्रजा आहात आणि परमेश्वराने भूतलावरील सर्व राष्ट्रांतून आपली खास प्रजा म्हणून तुम्हांला निवडून घेतले आहे.
शुद्ध आणि अशुद्ध प्राणी
(लेवी. 11:1-47)
3कोणताही अमंगळ पदार्थ खाऊ नका.
4खाण्यास पात्र असे पशू हे : गायबैल, शेरडेमेंढरे, 5सांबर, हरिण, भेकर, चितळ, रोही, गवा व रानमेंढा;
6पशूंपैकी ज्यांचे खूर चिरलेले किंवा दुभंगलेले आहेत व जे रवंथ करतात अशा पशूंचे मांस तुम्ही खावे;
7पण जे केवळ रवंथ करणारे किंवा ज्यांचे केवळ खूर दुभंगलेले आहेत, ते खाऊ नयेत; उंट, ससा व शाफान हे खाऊ नयेत, कारण ते रवंथ करतात पण त्यांचे खूर दुभंगलेले नाहीत, म्हणून ते तुम्ही अशुद्ध समजावेत.
8डुकराचा खूर दुभंगलेला आहे, पण तो रवंथ करीत नाही म्हणून तो तुम्ही अशुद्ध समजावा. त्यांचे मांस तुम्ही खाऊ नये आणि त्यांच्या शवांना शिवू नये.
9जलचरांपैकी तुम्हांला खाण्यास योग्य ते हे : ज्यांना पंख व खवले असतात ते तुम्ही खावेत.
10पण ज्यांना पंख आणि खवले नसतात ते तुम्ही खाऊ नयेत; ते तुम्ही अशुद्ध समजावेत.
11सर्व शुद्ध पक्षी तुम्ही खावेत.
12तुम्ही खाऊ नयेत ते हे : गरुड, लोळणारा गीध, कुरर;
13निरनिराळ्या जातीच्या घारी व ससाणे;
14निरनिराळ्या जातीचे कावळे;
15निरनिराळ्या जातीचे शहामृग, गवळण, कोकीळ व बहिरी ससाणे;
16पिंगळा, मोठे घुबड, पांढरे घुबड;
17पाणकोळी, गिधाड, करढोक;
18निरनिराळ्या जातीचे करकोचे व बगळे; टिटवी आणि वाघूळ.
19रांगणारे सर्व सपक्ष जीव तुम्ही अशुद्ध समजावेत; ते तुम्ही खाऊ नयेत.
20उडणारे सर्व शुद्ध जीव तुम्ही खावेत.
21आपोआप मेलेले काहीही तुम्ही खाऊ नये; तुमच्या वेशीच्या आत असलेल्या उपर्‍याला ते खायला द्यावे किंवा परक्याला विकून टाकावे; कारण तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याची पवित्र प्रजा आहात. करडू त्याच्या आईच्या दुधात शिजवू नये.
दशांश देण्याविषयी नियम
22दरवर्षी तुझ्या शेतातल्या पेरणीपासून जे उत्पन्न येईल त्याचा दशमांश अवश्य वेगळा काढून ठेव.
23जे स्थान तुझा देव परमेश्वर आपल्या नावाच्या निवासासाठी निवडील तेथे आपले धान्य, द्राक्षारस व तेल ह्यांचा दशमांश आणि आपली गुरेढोरे व शेरडेमेंढरे ह्यांचे प्रथमवत्स आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर खा; असे केल्याने तू आपला देव परमेश्वर ह्याचे भय निरंतर बाळगण्यास शिकशील;
24पण तुझा देव परमेश्वर ह्याने आपले नाव स्थापण्यासाठी जे स्थान निवडले असेल ते फार दूर असले व तेथपर्यंतचा प्रवास फार लांबचा असल्यामुळे तुझा देव परमेश्वर ह्याच्या आशीर्वादाने मिळेल त्याचा दशमांश तुला तिकडे घेऊन जाता आला नाही,
25तर तू तो विकून त्याचा पैसा कर व तो पैसा गाठीला बांधून तुझा देव परमेश्वर ह्याने निवडलेल्या स्थानाकडे घेऊन जा.
26त्या पैशाने तेथे गाईबैल, शेरडेमेंढरे, द्राक्षारस, मद्य अथवा तुझ्या मनाला येईल ती वस्तू घे आणि आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर आपल्या घरच्या मंडळीसह खाऊनपिऊन आनंद कर;
27आपल्या नगरातल्या लेव्याकडे दुर्लक्ष करू नकोस, कारण त्याला तुझ्यासारखा काही हिस्सा किंवा वतन नाही.
28दर तीन वर्षांनी तिसर्‍या वर्षाच्या उत्पन्नाचा दशमांश बाजूस काढून आपल्या गावात जमा कर;
29आणि लेव्याला तुझ्यासारखा काही हिस्सा किंवा वतन नाही म्हणून त्याने आणि तुझ्या गावातला उपरा, अनाथ व विधवा ह्यांनीही येऊन पोटभर खावे, म्हणजे तुझा देव परमेश्वर तुझ्या हातच्या सर्व कामाला बरकत देईल.

सध्या निवडलेले:

अनुवाद 14: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन