YouVersion लोगो
सर्च आयकॉन

दानीएल 10:11-14

दानीएल 10:11-14 MARVBSI

तो मला म्हणाला, “हे दानिएला, परमप्रिय पुरुषा, मी तुला सांगतो ते शब्द समजून घे; नीट उभा राहा; कारण मला आता तुझ्याकडे पाठवले आहे;” तो माझ्याबरोबर असे बोलला तेव्हा मी थरथर कापत उभा राहिलो. तो मला म्हणाला, “दानिएला, भिऊ नकोस; कारण ज्या दिवशी तू समज घेण्याचा, व आपल्या देवापुढे नम्र होण्याचा निश्‍चय केलास त्याच दिवशी तुझे शब्द ऐकण्यात आले; त्या तुझ्या शब्दांवरून मी आलो आहे. पारसाच्या राज्याचा अधिपती एकवीस दिवस मला आडवा आला; तेव्हा पाहा, मुख्य अधिपतींपैकी एक, मीखाएल, माझ्या साहाय्यास आला; व मी पारसाच्या राजांजवळ राहिलो. आता ह्या शेवटच्या दिवसांत तुझ्या लोकांचे काय होणार हे तुला कळवण्यास मी आलो आहे; कारण दृष्टान्ताची परिपूर्ती होण्यास बराच अवधी आहे.”