YouVersion लोगो
सर्च आयकॉन

दानीएल 10:1-6

दानीएल 10:1-6 MARVBSI

पारसाचा राजा कोरेश ह्याच्या कारकिर्दीच्या तिसर्‍या वर्षी बेल्टशस्सर हे नाव मिळालेल्या दानिएलास एक गोष्ट प्रकट झाली; ती गोष्ट सत्य असून मोठ्या युद्धाविषयीची होती; त्याला ती गोष्ट समजली; त्या दृष्टान्ताचे मर्म त्याला कळले. त्या दिवसांत मी दानीएल सबंध तीन सप्तके शोक करीत होतो. तीन सबंध सप्तके संपेपर्यंत मी स्वादिष्ट अन्न मुळीच खाल्ले नाही, मांस व द्राक्षारस ही माझ्या तोंडात गेली नाहीत आणि मी तैलाभ्यंगही केला नाही. पहिल्या महिन्याच्या चोविसाव्या तारखेस महानदी हिद्दकेल (टायग्रीस) हिच्या तीरी मी असता मी डोळे वर करून पाहिले तर तागाची वस्त्रे परिधान केलेला आणि कंबरेस उफाज देशाच्या शुद्ध सोन्याचा पट्टा घातलेला असा एक पुरुष माझ्या दृष्टीस पडला. त्याचे शरीर वैडूर्यमण्यासारखे असून त्याचे मुख विद्युल्लतेसारखे होते. त्याचे नेत्र पेटलेल्या दीपांसमान होते, त्याचे हातपाय उज्ज्वल पितळेसारखे होते आणि त्याच्या शब्दाचा ध्वनी एखाद्या समुदायाच्या गजबजाटासारखा होता.