तेव्हा तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात, म्हणून करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा; एकमेकांचे सहन करा, आणि कोणाविरुद्ध कोणाचे गार्हाणे असल्यास आपसांत क्षमा करा; प्रभूने तुम्हांला क्षमा केली तशी तुम्हीही करा; पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीती ती ह्या सर्वांवर धारण करा. ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणांत राज्य करो; तिच्याकरता तुम्हांला एकशरीर असे पाचारण्यात आले आहे; आणि तुम्ही कृतज्ञ असा. ख्रिस्ताचे वचन तुमच्यामध्ये भरपूर राहो; परस्परांना सर्व ज्ञानाने शिकवण द्या व बोध करा; आपल्या अंतःकरणात देवाला स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक गायने कृपेच्या प्रेरणेने गा; आणि बोलणे किंवा करणे जे काही तुम्ही कराल, ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा; आणि त्याच्या द्वारे देव जो पिता त्याची उपकारस्तुती करा. स्त्रियांनो, जसे प्रभूमध्ये उचित आहे त्याप्रमाणे तुम्ही आपापल्या पतीच्या अधीन असा. पतींनो, तुम्ही आपापल्या पत्नीवर प्रीती करा, व तिच्याशी निष्ठुरतेने वागू नका. मुलांनो, तुम्ही सर्व गोष्टींत आपल्या आईबापांची आज्ञा पाळा; हे प्रभूला संतोषकारक1 आहे. बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिडीस आणू नका; आणाल तर ती खिन्न होतील.
कलस्सै 3 वाचा
ऐका कलस्सै 3
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: कलस्सै 3:12-21
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ