YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 7:17-29

प्रेषितांची कृत्ये 7:17-29 MARVBSI

मग देवाने अब्राहामाला जे अभिवचन दिले होते ते पूर्ण होण्याचा समय जसजसा जवळ आला तसतसे ते लोक मिसर देशात ‘वाढून संख्येने पुष्कळ झाले. योसेफाची माहिती नसलेला असा दुसरा राजा मिसर देशाच्या गादीवर बसेपर्यंत’ असे चालले. तो राजा आपल्या ‘लोकांबरोबर कपटाने वागला’ आणि त्यांची बालके ‘जगू’ नयेत म्हणून ती बाहेर टाकून देण्यास त्याने त्यांना भाग पाडले; असे त्याने आपल्या पूर्वजांना ‘छळले’. त्याच काळात मोशेचा जन्म झाला. तो देवाच्या दृष्टीने अतिशय सुंदर होता; त्याचे पालनपोषण ‘तीन महिनेपर्यंत’ त्याच्या पित्याच्या घरी झाले; मग त्याला बाहेर टाकून देण्यात आले असता फारोच्या कन्येने त्याला घेऊन आपला पुत्र म्हणून त्याचे संगोपन केले. मोशेला मिसरी लोकांच्या सर्व विद्यांचे शिक्षण मिळाले आणि तो भाषणात व कृतीत पराक्रमी होता. मग तो जवळ जवळ चाळीस वर्षांचा झाला तेव्हा ‘आपले बांधव म्हणजे इस्राएलाचे संतान’ ह्यांची भेट घ्यावी असे त्याच्या मनात आले. तेव्हा मोशेने त्यांच्यातील कोणाएकावर अन्याय होत आहे असे पाहून ह्या जाचलेल्या माणसाचा कैवार घेतला आणि ‘मिसर्‍याला मारून’ त्याचा सूड उगवला. तेव्हा देव त्याच्या हातून त्याच्या बांधवांची सुटका करत आहे हे त्यांना समजले असेल असे त्याला वाटले होते, पण ते त्यांना समजले नाही. मग दुसर्‍या दिवशी कोणी भांडत असता तो त्यांच्यापुढे येऊन उभा राहिला व त्यांची समजूत घालण्याकरता त्यांना म्हणाला, ‘गृहस्थांनो, तुम्ही भाऊबंद आहात; एकमेकांवर अन्याय का करता?’ तेव्हा ‘जो आपल्या शेजार्‍यावर अन्याय करत होता तो’ त्याला ढकलून देऊन म्हणाला, ‘तुला आमच्यावर अधिकारी व न्यायाधीश कोणी केले? काल तू मिसर्‍याला ठार मारले तसे मलाही मारायला पाहतोस काय?’ हे शब्द ऐकताच मोशे परत गेला आणि मिद्यान देशात उपरा झाला; तेथे त्याला दोन मुलगे झाले.

प्रेषितांची कृत्ये 7:17-29 साठी चलचित्र