YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 5:25-33

प्रेषितांची कृत्ये 5:25-33 MARVBSI

इतक्यात कोणीतरी येऊन त्यांना असे सांगितले की, “पाहा, ज्या माणसांना तुम्ही तुरुंगात ठेवले होते ते तर मंदिरात उभे राहून लोकांना शिक्षण देत आहेत.” तेव्हा सरदाराने शिपायांसह जाऊन त्यांना जुलूम न करता आणले; कारण लोक आपणाला दगडमार करतील असे त्यांना भय वाटत होते. त्यांनी त्यांना आणून न्यायसभेपुढे उभे केले. तेव्हा प्रमुख याजकाने त्यांना विचारले, “ह्या नावाने शिक्षण देऊ नका असे आम्ही तुम्हांला निक्षून सांगितले होते की नाही? तरी पाहा, तुम्ही आपल्या शिकवणीने यरुशलेम भरून टाकले आहे आणि ह्या मनुष्याच्या रक्तपाताचा दोष आमच्यावर आणू पाहत आहात.” परंतु पेत्राने व इतर प्रेषितांनी उत्तर दिले, “आम्ही मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे. ज्या येशूला तुम्ही खांबावर टांगून मारले त्याला आपल्या पूर्वजांच्या देवाने उठवले. त्याने इस्राएलाला पश्‍चात्ताप व पापांची क्षमा ही देणगी द्यावी म्हणून देवाने त्याला आपल्या उजव्या हाताशी अधिपती व तारणारा असे उच्चपद दिले. ह्या गोष्टींविषयी आम्ही साक्षी आहोत आणि देवाने आपल्या आज्ञा पाळणार्‍यांना जो पवित्र आत्मा दिला आहे तोही साक्षी आहे.” हे ऐकून ते चिडून गेले आणि त्यांना जिवे मारण्याचा विचार करू लागले.

प्रेषितांची कृत्ये 5:25-33 साठी चलचित्र