YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 5:25-33

प्रेषितांची कृत्ये 5:25-33 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

इतक्यात कोणीतरी येऊन त्यांना असे सांगितले की, “पाहा, ज्या माणसांना तुम्ही तुरुंगात ठेवले होते ते तर मंदिरात उभे राहून लोकांना शिक्षण देत आहेत.” तेव्हा सरदाराने शिपायांसह जाऊन त्यांना जुलूम न करता आणले; कारण लोक आपणाला दगडमार करतील असे त्यांना भय वाटत होते. त्यांनी त्यांना आणून न्यायसभेपुढे उभे केले. तेव्हा प्रमुख याजकाने त्यांना विचारले, “ह्या नावाने शिक्षण देऊ नका असे आम्ही तुम्हांला निक्षून सांगितले होते की नाही? तरी पाहा, तुम्ही आपल्या शिकवणीने यरुशलेम भरून टाकले आहे आणि ह्या मनुष्याच्या रक्तपाताचा दोष आमच्यावर आणू पाहत आहात.” परंतु पेत्राने व इतर प्रेषितांनी उत्तर दिले, “आम्ही मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे. ज्या येशूला तुम्ही खांबावर टांगून मारले त्याला आपल्या पूर्वजांच्या देवाने उठवले. त्याने इस्राएलाला पश्‍चात्ताप व पापांची क्षमा ही देणगी द्यावी म्हणून देवाने त्याला आपल्या उजव्या हाताशी अधिपती व तारणारा असे उच्चपद दिले. ह्या गोष्टींविषयी आम्ही साक्षी आहोत आणि देवाने आपल्या आज्ञा पाळणार्‍यांना जो पवित्र आत्मा दिला आहे तोही साक्षी आहे.” हे ऐकून ते चिडून गेले आणि त्यांना जिवे मारण्याचा विचार करू लागले.

प्रेषितांची कृत्ये 5:25-33 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

इतक्यात कोणीतरी येऊन त्यांना असे सांगितले, पाहा, “ज्या मनुष्यास तुम्ही तुरुंगात ठेवले होते ते तर परमेश्वराच्या भवनात उभे राहून लोकांस शिक्षण देत आहेत.” तेव्हा सरदाराने शिपायांसह जाऊन त्यांना जुलूम न करता आणले, कारण लोक आपणाला दगडमार करतील, असे त्यांना भय वाटत होते. त्यांनी त्यांना आणून न्यायसभेपुढे उभे केले, तेव्हा महायाजकाने त्यांना विचारले, “या नावाने शिक्षण देऊ नका, असे आम्ही तुम्हास निक्षून सांगितले होते की नाही, तरी पाहा, तुम्ही आपल्या शिकवणीने यरूशलेम शहर भरून टाकले आहे आणि या मनुष्याच्या रक्तपाताचा दोष आमच्यावर आणू पाहत आहात.” परंतु पेत्राने व इतर प्रेषितांनी उत्तर दिले, “आम्ही मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे, ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर टांगून मारले, त्यास आपल्या पूर्वजांच्या देवाने उठवले. त्याने इस्राएलाला पश्चात्ताप व पापांची क्षमा ही देणगी देण्याकरता देवाने त्यास आपल्या उजव्या हाताशी अधिपती व तारणारा असे उच्चपद दिले. या गोष्टीविषयी आम्ही साक्षी आहोत आणि देवाने आपल्या आज्ञा पाळणाऱ्यांना जो पवित्र आत्मा दिला, आहे तो सुध्दा साक्षी आहे.” हे ऐकून ते चिडून गेले आणि त्यांना जिवे मारण्याचा विचार करू लागले.

प्रेषितांची कृत्ये 5:25-33 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

इतक्यात कोणीतरी येऊन सांगितले, “पाहा! ज्यांना तुम्ही तुरुंगात ठेवले होते ती माणसे मंदिराच्या आवारात उभे राहून लोकांना शिक्षण देत आहेत.” तेव्हा सुरक्षा अधिकारी आपल्याबरोबर काही शिपाई घेऊन गेला आणि त्याने प्रेषितांना जुलूम न करता आणले, कारण लोक आपल्याला धोंडमार करतील, अशी त्यांना भीती वाटत होती. प्रेषितांना घेऊन आल्यानंतर, महायाजकाने त्यांना प्रश्न विचारावे म्हणून न्यायसभेपुढे आणून उभे केले. ते म्हणाले, “या नावाने शिकवू नका, असे आम्ही तुम्हाला कडक शब्दात सांगितले होते तरी पाहा, तुम्ही तुमच्या शिक्षणाने सारे यरुशलेम भरून टाकले आहे आणि या मनुष्याच्या रक्ताचा दोष आम्हावर लावण्याचा निश्चय केला आहे.” परंतु पेत्र व इतर प्रेषितांनी उत्तर दिले, “आम्ही मनुष्यापेक्षा परमेश्वराची आज्ञा पाळलीच पाहिजे. तुम्ही येशूंना क्रूसावर टांगून मारल्यानंतर आमच्या पूर्वजांच्या परमेश्वराने येशूंना मरणातून पुन्हा जिवंत केले. आता परमेश्वराने त्यांना उच्च केले व राजपुत्र आणि तारणारा म्हणून स्वतःच्या उजवीकडे बसविले आहे, ते यासाठी की इस्राएली लोकांना पश्चात्ताप व पापक्षमेचा लाभ व्हावा. या गोष्टींचे आम्ही साक्षी आहोत आणि पवित्र आत्मा, ज्याला परमेश्वराने जे त्यांची आज्ञा पाळतात त्यांना दिला आहे तोही साक्षी आहे.” हे ऐकल्यावर ते अतिशय संतापले व त्यांना मारून टाकण्याचे त्यांनी ठरविले.

प्रेषितांची कृत्ये 5:25-33 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

इतक्यात कोणी तरी येऊन त्यांना असे सांगितले, “पाहा, ज्या माणसांना तुम्ही तुरुंगात ठेवले होते, ते तर मंदिरात उभे राहून लोकांना शिकवण देत आहेत!” तेव्हा अधिकाऱ्याने शिपायांसह जाऊन त्यांच्यावर जुलूम जबरदस्ती न करता त्यांना आणले, कारण लोक आपल्याला दगड मारतील, अशी त्यांना भीती वाटत होती. त्यांनी त्यांना आणून न्यायसभेपुढे उभे केले. उच्च याजकाने प्रेषितांना विचारले, “ह्या नावाने शिकवण देऊ नका, असे आम्ही तुम्हांला बजावले होते की नाही? तरी पाहा, तुम्ही आपल्या शिकवणीने यरुशलेम भरून टाकले आहे आणि ह्या मनुष्याच्या रक्तपाताचा दोष आमच्यावर आणू पाहत आहात!” परंतु पेत्राने व इतर प्रेषितांनी उत्तर दिले, “आम्ही मनुष्यापेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे. ज्या येशूला तुम्ही क्रुसावर टांगून मारले त्याला आपल्या पूर्वजांच्या देवाने उठविले. त्याने इस्राएलला पश्चात्ताप व पापांची क्षमा द्यावी म्हणून देवाने त्याला आपल्या उजव्या हाताशी अधिपती व तारणारा असे उच्च पद दिले. ह्या गोष्टींविषयी आम्ही साक्षीदार आहोत आणि देवाने त्याच्या आज्ञा पाळणाऱ्यांना जो पवित्र आत्मा दिला आहे, तोही साक्षीदार आहे.” हे ऐकून न्यायसभेचे सदस्य संतापले आणि प्रेषितांना ठार मारण्याचा विचार करू लागले.