YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 28:26-30

प्रेषितांची कृत्ये 28:26-30 MARVBSI

‘ह्या लोकांकडे जाऊन सांग की, तुम्ही ऐकाल तर खरे, परंतु तुम्हांला समजणार नाही; व पाहाल तर खरे, परंतु तुम्हांला दिसणार नाही; कारण ह्या लोकांचे अंतःकरण जड झाले आहे; ते कानांनी मंद ऐकतात; आणि त्यांनी आपले डोळे मिटून घेतले आहेत; ह्यासाठी की, त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, कानांनी ऐकू नये, मनाने समजू नये, त्यांनी वळू नये, आणि मी त्यांना बरे करू नये.’ म्हणून तुम्हांला ठाऊक असो की, ‘हे देवाने सिद्ध केलेले तारण परराष्ट्रीयांकडे’ पाठवले आहे; आणि ते ते श्रवण करतील.” [तो असे बोलल्यावर यहूदी आपसांत बराच वादविवाद करत निघून गेले.] तो आपल्या भाड्याच्या घरात पुरी दोन वर्षे राहिला, आणि जे त्याच्याकडे येत असत त्या सर्वांचे तो स्वागत करत असे.

प्रेषितांची कृत्ये 28:26-30 साठी चलचित्र

प्रेषितांची कृत्ये 28:26-30शी संबंधित विनामूल्य वाचन योजना आणि भक्ती