तेव्हा फार दिवस झाल्यामुळे आणि तितक्यात उपासाचे दिवसही होऊन गेल्यामुळे त्या वेळेस समुद्रावरून जाणे संकटाचे होते, म्हणून पौल त्यांना असे सुचवत होता की, “अहो गृहस्थांनो, ह्या जलप्रवासात केवळ मालाचे आणि तारवाचे नुकसान नव्हे, तर आपल्या जिवांचेही हाल होऊन मोठी हानी होईल असे मला दिसते.” तथापि शताधिपतीने पौलाच्या म्हणण्यापेक्षा तांडेल व तारवाचा धनी ह्यांच्याकडे अधिक लक्ष दिले. ते बंदर हिवाळ्यात राहायला सोईचे नव्हते म्हणून बहुतेकांनी मसलत दिली की, तेथून निघावे आणि साधेल तर क्रेतातील फेनिके बंदरात जाऊन तेथे हिवाळा घालवावा; हे नैऋत्याभिमुख व वायव्याभिमुख आहे. मग दक्षिणेचा वारा मंद वाहत असल्यामुळे आपला बेत सिद्धीस गेलाच असे समजून, ते तेथून नांगर उचलून काठाकाठाने क्रेताच्या बाजूने गेले. परंतु थोड्या वेळानंतर युरकुलोन नावाचा तुफानी वारा तिकडून सुटला; त्यात तारू सापडून वार्याच्या तोंडी ठरेना, म्हणून आम्ही त्याच्या स्वाधीन होऊन वाहवत चाललो. मग कौदा नावाच्या एका लहान बेटावरून जाताना आम्ही मोठ्या प्रयासाने होडी आपल्या स्वाधीन करून घेतली. ती वर घेतल्यावर त्यांनी साहित्यांची योजना करून तारू खालून आवळून बांधले; आणि आपण सुर्ती नावाच्या भाटीवर जाऊन आदळू असे त्यांना भय वाटले म्हणून त्यांनी शीड उतरले; मग ते तसेच वाहवत गेले. तेव्हा वादळाने आमचे फार हाल होऊ लागल्यामुळे ते दुसर्या दिवशी भरगत टाकून देऊ लागले; आणि तिसर्या दिवशी त्यांनी आपल्या हातांनी तारवाचे अवजार टाकून दिले. मग पुष्कळ दिवस सूर्य व तारेही दिसले नाहीत आणि तुफानाचा जोर आम्हांला फारच भासला; त्यामुळे शेवटी आमची तरण्याची आशा हळूहळू सोडून द्यावी लागली.
प्रेषितांची कृत्ये 27 वाचा
ऐका प्रेषितांची कृत्ये 27
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: प्रेषितांची कृत्ये 27:9-20
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ