नंतर दिवस उगवण्याच्या सुमारास पौल सर्वांना अन्न खाण्याविषयी विनंती करून म्हणाला, “आज चौदा दिवस तुम्ही वाट पाहत उपाशी राहिला आहात; तुम्ही काही खाल्ले नाही. म्हणून मी तुम्हांला विनंती करतो की, अन्न खा; त्याच्याने तुमचा निभाव लागेल; कारण तुमच्यापैकी कोणाच्या डोक्याच्या केसाचादेखील नाश होणार नाही.” असे म्हणून त्याने भाकर घेऊन त्या सर्वांसमक्ष देवाचे आभार मानले आणि ती मोडून तो खाऊ लागला. मग त्या सर्वांना धीर येऊन त्यांनीही अन्न खाल्ले. त्या तारवात आम्ही सर्व मिळून दोनशे शाहत्तर जण होतो. जेवून तृप्त झाल्यावर ते समुद्रात गहू टाकून देऊन तारू हलके करू लागले.
प्रेषितांची कृत्ये 27 वाचा
ऐका प्रेषितांची कृत्ये 27
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: प्रेषितांची कृत्ये 27:33-38
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ