प्रेषितांची कृत्ये 16:38-40
प्रेषितांची कृत्ये 16:38-40 MARVBSI
मग चोपदारांनी हे वर्तमान अधिकार्यांना सांगितले. तेव्हा ते रोमी आहेत हे ऐकून त्यांना भय वाटले. मग त्यांनी येऊन त्यांची समजूत घातली; आणि त्यांना बाहेर आणून नगरातून निघून जाण्याची विनंती केली. मग ते बंदिशाळेतून निघून लुदियेच्या घरी गेले, बंधुजनांस भेटून त्यांनी त्यांना धीर दिला आणि तेथून ते मार्गस्थ झाले.