प्रेषितांची कृत्ये 16:38-40
प्रेषितांची कृत्ये 16:38-40 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग चोपदारांनी हे वर्तमान अधिकार्यांना सांगितले. तेव्हा ते रोमी आहेत हे ऐकून त्यांना भय वाटले. मग त्यांनी येऊन त्यांची समजूत घातली; आणि त्यांना बाहेर आणून नगरातून निघून जाण्याची विनंती केली. मग ते बंदिशाळेतून निघून लुदियेच्या घरी गेले, बंधुजनांस भेटून त्यांनी त्यांना धीर दिला आणि तेथून ते मार्गस्थ झाले.
प्रेषितांची कृत्ये 16:38-40 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग चोपदारांनी हे वर्तमान अधिकाऱ्यास सांगितले, तेव्हा ते रोमन आहेत हे ऐकून त्यास भय वाटले. मग त्यांनी येऊन त्यांची समजूत घातली; आणि त्यांना बाहेर आणून नगरातून निघून जाण्याची विनंती केली. मग ते बंदीशाळेतून निघून लुदियेच्या घरी गेले, बंधुजनांस भेटून त्यांनी त्यांना धीर दिला आणि तेथून ते मार्गस्थ झाले.
प्रेषितांची कृत्ये 16:38-40 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
अधिकार्यांनी जाऊन हे शब्द न्यायाधीशांना कळविले, पौल व सीला हे रोमी नागरिक आहेत, हे त्यांना समजले तेव्हा ते घाबरले. आणि त्यांना शांत करण्यासाठी ते स्वतः तुरुंगात आले आणि तुरुंगाच्या बाहेर आणून, ते शहर सोडून जावे अशी त्यांना विनंती केली. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पौल व सीला हे लुदियेच्या घरी गेले आणि बंधू भगिनींना भेटून त्यांना उत्तेजित केले. नंतर ते तिथून निघाले.
प्रेषितांची कृत्ये 16:38-40 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग चोपदारांनी हे वर्तमान अधिकार्यांना सांगितले. तेव्हा ते रोमी आहेत हे ऐकून त्यांना भय वाटले. मग त्यांनी येऊन त्यांची समजूत घातली; आणि त्यांना बाहेर आणून नगरातून निघून जाण्याची विनंती केली. मग ते बंदिशाळेतून निघून लुदियेच्या घरी गेले, बंधुजनांस भेटून त्यांनी त्यांना धीर दिला आणि तेथून ते मार्गस्थ झाले.
प्रेषितांची कृत्ये 16:38-40 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
शिपायांनी हे अधिकाऱ्यांना सांगितले. ते रोमन नागरिक आहेत हे ऐकून त्यांना भय वाटले. म्हणून त्यांनी येऊन दिलगिरी व्यक्त केली आणि त्यांना बाहेर आणून शहर सोडून जाण्याची विनंती केली. ते तुरुंगातून निघून लुदियाच्या घरी गेले. तेथे बंधुजनांना भेटून त्यांनी त्यांना धीर दिला आणि तिथूनच ते मार्गस्थ झाले.