YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 14:21-25

प्रेषितांची कृत्ये 14:21-25 MARVBSI

त्या नगरात सुवार्ता सांगून त्यांनी पुष्कळ शिष्य केल्यावर लुस्त्र, इकुन्या व अंत्युखिया ह्या नगरांत ते परत आले; आणि शिष्यांची मने स्थिरावून त्यांनी त्यांना असा बोध केला की, ‘विश्वासात टिकून राहा; कारण आपल्याला पुष्कळ संकटांत टिकून देवाच्या राज्यात जावे लागते.’ त्यांनी त्यांच्यासाठी प्रत्येक मंडळीत वडील निवडले; आणि उपास व प्रार्थना करून ज्या प्रभूवर त्यांनी विश्वास ठेवला होता त्याच्याकडे त्यांना सोपवले. मग ते पिसिदियामधून पंफुल्यात गेले. आणि पिर्गा येथे वचन सांगितल्यावर ते अत्तलियास उतरले.

प्रेषितांची कृत्ये 14:21-25 साठी चलचित्र