प्रेषितांची कृत्ये 14:21-25
प्रेषितांची कृत्ये 14:21-25 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि त्या नगरात त्यांनी सुवार्ता सांगून अनेक लोकांस शिष्य केले, त्यानंतर ते लुस्र, इकुन्या आणि अंत्युखिया नगरांना परत आले. आणि त्यांनी तेथील शिष्यांना येशूवरील विश्वासात बळकट केले, त्यांनी आपल्या विश्वासांत अढळ रहावे म्हणून उत्तेजन दिले, ते म्हणाले, “अनेक दुःखांना तोंड देत आपण देवाच्या राज्यात प्रवेश केला पाहिजे.” पौल व बर्णबाने प्रत्येक मंडळीत वडीलजनांची नेमणूक केली, त्यांनी या वडिलांसाठी उपवास आणि प्रार्थना केल्या, प्रभू येशूवर विश्वास असलेले असे सर्व वडीलजन होते म्हणून पौलाने व बर्णबाने त्यांना प्रभूच्या हाती सोपवले. पौल आणि बर्णबा पिसिदिया प्रदेशातून गेले नंतर ते पंफुलिया येथे आले. त्यांनी पिर्गा शहरात देवाचा संदेश दिला नंतर ते अत्तलिया शहरात गेले.
प्रेषितांची कृत्ये 14:21-25 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्यांनी त्या शहरात शुभवार्तेचा प्रचार करून मोठ्या संख्येने शिष्य बनविले. नंतर ते लुस्त्र, इकुन्या व अंत्युखिया या शहरात परत आले. त्यांनी शिष्यांना बळकटी येण्यासाठी आणि विश्वासात एकनिष्ठतेने टिकून राहण्यासाठी उत्तेजन दिले, कारण “परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी आपल्याला अनेक संकटातून गेले पाहिजे,” असे ते म्हणाले. पौल आणि बर्णबाने प्रत्येक मंडळीमध्ये वडिलांची नेमणूक केली आणि उपास व प्रार्थना करून ज्या प्रभूवर त्यांनी विश्वास ठेवला होता, त्या प्रभूला त्यांचे समर्पण केले. नंतर पिसिदियामधून जात असताना ते पंफुल्यात आले, आणि पेर्गा येथे वचनाचा प्रचार केल्यानंतर ते खाली अत्तलिया येथे गेले.
प्रेषितांची कृत्ये 14:21-25 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
त्या नगरात सुवार्ता सांगून त्यांनी पुष्कळ शिष्य केल्यावर लुस्त्र, इकुन्या व अंत्युखिया ह्या नगरांत ते परत आले; आणि शिष्यांची मने स्थिरावून त्यांनी त्यांना असा बोध केला की, ‘विश्वासात टिकून राहा; कारण आपल्याला पुष्कळ संकटांत टिकून देवाच्या राज्यात जावे लागते.’ त्यांनी त्यांच्यासाठी प्रत्येक मंडळीत वडील निवडले; आणि उपास व प्रार्थना करून ज्या प्रभूवर त्यांनी विश्वास ठेवला होता त्याच्याकडे त्यांना सोपवले. मग ते पिसिदियामधून पंफुल्यात गेले. आणि पिर्गा येथे वचन सांगितल्यावर ते अत्तलियास उतरले.
प्रेषितांची कृत्ये 14:21-25 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
त्या नगरात शुभवर्तमान घोषित करून त्यांनी पुष्कळ शिष्य मिळवल्यावर लुस्त्र, इकुन्य व पिसिदियामधील अंत्युखिया या नगरांत ते परत आले. शिष्यांची मने स्थिरावून त्यांनी त्यांना असा बोध केला, “विश्वासात टिकून राहा; कारण आपल्याला पुष्कळ संकटांतून देवाच्या राज्यात जावे लागते.” त्यांनी त्यांच्यासाठी प्रत्येक ख्रिस्तमंडळीत वडीलजन निवडले आणि उपवास व प्रार्थना करून ज्या प्रभूवर त्यांनी विश्वास ठेवला होता, त्याच्याकडे त्यांना सोपवले. ते पिसिदियामधून पंफुल्यात गेले आणि पिर्गा येथे वचन सांगितल्यावर ते अत्तलियास उतरले.