YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 1:21-26

प्रेषितांची कृत्ये 1:21-26 MARVBSI

म्हणून योहानाच्या बाप्तिस्म्यापासून तर ज्या दिवशी प्रभू येशूला आपल्यापासून वर घेण्यात आले तोपर्यंत, म्हणजे तो आपल्यामध्ये येत-जात असे त्या सगळ्या काळात ही जी माणसे आपल्या संगतीसोबतीत होती त्यांच्यातून एकाने आपल्याबरोबर त्याच्या पुनरुत्थानाचा साक्षी झाले पाहिजे.” तेव्हा ज्याचे उपनाव युस्त होते तो बर्सब्बा म्हटलेला योसेफ व मत्थिया, ह्या दोघांना त्यांनी पुढे आणले. मग त्यांनी अशी प्रार्थना केली, “हे सर्वांची हृदये जाणणार्‍या प्रभू, हे सेवकपद व प्रेषितपद सोडून आपल्या जागी गेलेल्या यहूदाचे पद ज्याला मिळावे असा ह्या दोघांपैकी तू कोण निवडला आहेस ते दाखव.” मग त्यांनी त्यांच्यासाठी चिठ्ठ्या टाकल्यावर मत्थियाची चिठ्ठी निघाली; तेव्हा त्याला अकरा प्रेषितांबरोबर गणण्यात आले.

प्रेषितांची कृत्ये 1:21-26 साठी चलचित्र