तू ह्या गोष्टींची त्यांना आठवण दे; त्यांना प्रभूसमोर निक्षून सांग की, शब्दयुद्ध करू नका; ते कशाच्याही उपयोगी न पडता ऐकणार्यांच्या नाशास कारण होते. तू सत्याच्या वचनाची योग्य विभागणी करून नीट सांगणारा, लाज वाटण्यास कसलेही कारण नसलेला, देवाच्या पसंतीस उतरलेला कामकरी, असा स्वत:ला सादर करण्यास होईल तितके कर. अनीतीच्या रिकाम्या वटवटीपासून दूर राहा; अशा वटवटी करणारे अभक्तीत अधिक सरसावतील; आणि त्यांचे शिक्षण काळपुळीसारखे चरेल; त्यांच्यापैकी हुमनाय व फिलेत हे आहेत; ते सत्याविषयी चुकले आहेत; पुनरुत्थान होऊन गेले आहे असे ते म्हणतात, आणि कित्येकांच्या विश्वासाचा नाश करतात. तथापि देवाने घातलेला स्थिर पाया टिकून राहतो, त्यावर हा शिक्का मारलेला आहे : “प्रभू आपले जे आहेत त्यांना ओळखतो,” आणि “जो कोणी प्रभूचे नाव घेतो त्याने अनीतीपासून दूर राहावे.”
2 तीमथ्य 2 वाचा
ऐका 2 तीमथ्य 2
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: 2 तीमथ्य 2:14-19
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ