मग इस्राएलाचे सर्व वंश हेब्रोनात दाविदाकडे येऊन म्हणाले, “पाहा, आम्ही आपल्या हाडामांसाचे आहोत, गतकाली शौल आमच्यावर राजा असता इस्राएल लोकांची नेआण करणारे पुढारी आपणच होता; आणि परमेश्वर आपणास म्हणाला होता की, माझी प्रजा इस्राएल हिचा मेंढपाळ व अधिपती तूच होशील.” ह्या प्रकारे इस्राएलांचे सर्व वडील जन हेब्रोनात राजाकडे आले, आणि दावीद राजाने त्यांच्याशी हेब्रोनात परमेश्वरासमोर करार केला, आणि त्यांनी दाविदाला अभिषेक करून इस्राएलांवर राजा नेमले. दावीद राज्य करू लागला तेव्हा तो तीस वर्षांचा होता; त्याने चाळीस वर्षे राज्य केले. साडेसात वर्षे त्याने हेब्रोनात यहूदावर राज्य केले आणि तेहेतीस वर्षे यरुशलेमेत सर्व इस्राएल व यहूदा ह्यांच्यावर राज्य केले.
२ शमुवेल 5 वाचा
ऐका २ शमुवेल 5
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: २ शमुवेल 5:1-5
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ