ह्यानंतर असे झाले की अबशालोमाने आपल्यासाठी रथ, घोडे व आपल्यापुढे दौडण्यासाठी पन्नास माणसे ठेवली. अबशालोम नित्य पहाटेस उठून वेशीकडे जाणार्या रस्त्यात उभा राही आणि कोणी फिर्यादी दाद मागण्यासाठी राजाकडे आला म्हणजे त्याला बोलावून “तू कोणत्या नगराचा आहेस,” असे विचारी; तेव्हा तो म्हणे, “तुझा दास इस्राएलाच्या अमुक अमुक वंशातला आहे.” तेव्हा अबशालोम त्याला म्हणे, “पाहा, तुझे प्रकरण चांगले व वाजवी आहे; पण तुझे ऐकून घेण्यासाठी राजाच्या वतीने कोणी मनुष्य नेमलेला नाही.” अबशालोम त्याला आणखी म्हणे, “मला ह्या देशात न्यायाधीश केले असते तर किती बरे झाले असते? एखाद्याने आपला कज्जा किंवा प्रकरण माझ्याकडे आणले असते तर मी त्याला न्याय दिला असता.” एखादा त्याला मुजरा करायला जवळ येई तेव्हा तो आपला हात पुढे करून त्याला धरून त्याचे चुंबन घेई. इस्राएलातले जे जे लोक राजाकडे न्याय मागण्यासाठी येत त्या सर्वांशी तो असाच वागे; ह्या प्रकारे अबशालोमाने इस्राएल लोकांची मने हरण केली. चार वर्षे संपल्यावर अबशालोम राजाला म्हणाला, “मला परवानगी असावी, म्हणजे परमेश्वराला मी जो नवस केला आहे तो हेब्रोन येथे जाऊन फेडीन. मी अरामातील गशूर येथे राहत होतो तेव्हा आपल्या दासाने असा नवस केला होता की, परमेश्वराने मला यरुशलेमेत माघारी नेले तर मी परमेश्वराप्रीत्यर्थ अर्पणे करीन.” राजा त्याला म्हणाला, “खुशाल जा.” मग तो उठून हेब्रोनास गेला. अबशालोमाने इस्राएलाच्या सर्व वंशांकडे हेर पाठवून जाहीर केले की, “रणशिंगाचा शब्द तुम्ही ऐकाल तेव्हा असा घोष करा की, अबशालोम हेब्रोनास राजा झाला आहे.” अबशालोमाच्या सांगण्यावरून त्याच्याबरोबर दोनशे पुरुष गेले. ते भोळ्या भावाने गेले; त्यांना काहीएक ठाऊक नव्हते. यज्ञ करीत असताना अबशालोमाने दाविदाचा मंत्री गिलोनी अहीथोफेल ह्याला त्याचे नगर गिलो येथून बोलावून आणले. बंड वाढत गेले व अबशालोमाकडे लोक एकसारखे जमत गेले.
२ शमुवेल 15 वाचा
ऐका २ शमुवेल 15
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: २ शमुवेल 15:1-12
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ