त्या वेळी वेशीच्या बाहेर चार कोडी माणसे होती. ती एकमेकांना म्हणाली, “येथे बसून का मरावे? नगरात जाऊ म्हटले तर तेथेही आपण मरणारच, कारण तेथे महागाई आणि येथे बसून राहिलो तरीही मरणारच; तर चला, आपण अरामी सेनेस जाऊन मिळू; त्यांनी आपल्याला जिवंत ठेवले तर आपण जगू; त्यांनी आपल्याला मारून टाकले तर आपण मरू एवढेच.” ते संध्याकाळच्या वेळी अरामी लोकांच्या छावणीकडे जायला निघाले; अरामी लोकांच्या छावणीच्या हद्दीवर ते येऊन पाहतात तर तेथे एकही माणूस नव्हता. कारण परमेश्वराने रथ, घोडे व प्रचंड सैन्य ह्यांचा गलबला अरामी सेनेच्या कानी पाडला; तेव्हा ते आपसांत म्हणाले, “पाहा, इस्राएलाच्या राजाने हित्ती व मिसरी राजे द्रव्य देऊ करून बोलावले आहेत.” म्हणून त्यांनी संध्याकाळी उठून पलायन केले; आणि आपले डेरे, घोडे व गाढवे जागच्या जागी टाकून व छावणी सोडून ते आपला जीव घेऊन पळाले. छावणीच्या बाहेरल्या हद्दीशी आल्यावर त्या कोड्यांनी एका तंबूत जाऊन तेथे खाणेपिणे केले आणि त्यातून रुपे, सोने व वस्त्रे नेऊन लपवून ठेवली; मग परत येऊन ते दुसर्या डेर्यात गेले आणि त्यातूनही माल नेऊन त्यांनी लपवून ठेवला.
२ राजे 7 वाचा
ऐका २ राजे 7
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: २ राजे 7:3-8
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ