नंतर राजाने सर्व लोकांना आज्ञा दिली की, “ह्या कराराच्या ग्रंथात लिहिले आहे त्याप्रमाणे तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ वल्हांडण सण पाळा.” असा वल्हांडण सण इस्राएलाचे शास्ते शासन करत होते त्यांच्या काळापासून व इस्राएलाचे राजे व यहूदाचे राजे ह्यांच्या कारकिर्दीत कधी पाळण्यात आला नव्हता; योशीया राजाच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी परमेश्वराप्रीत्यर्थ यरुशलेमेत वल्हांडण सण पाळण्यात आला. ह्याखेरीज हिल्कीया याजक ह्याला परमेश्वराच्या मंदिरात जो ग्रंथ सापडला होता त्यातील नियमशास्त्राची वचने स्थापित करावीत म्हणून यहूदा देशात व यरुशलेमेत दैवज्ञ व चेटकी आणि कुलदेवता, मूर्ती आदिकरून ज्या अमंगळ वस्तू योशीयाच्या नजरेस पडल्या त्या त्याने काढून टाकल्या. मोशेच्या नियमशास्त्रानुसार आपल्या सर्व मनाने, आपल्या सर्व जिवाने व आपल्या सर्व बलाने परमेश्वरभजनी लागणारा योशीयासारखा राजा पूर्वी होऊन गेला नाही व पुढेही झाला नाही. एवढे त्याने केले तरीदेखील मनश्शेने जी संतापजनक कृत्ये करून परमेश्वराला संतप्त केले होते त्यामुळे परमेश्वराचा जो महाक्रोध यहूदावर भडकला होता तो शमला नाही. परमेश्वर म्हणाला, “मी इस्राएलास जसे आपल्या नजरेपुढून दूर केले तसेच यहूदासही दूर करीन; हे यरुशलेम नगर मी निवडले होते व ह्या मंदिरात माझ्या नावाचा निवास होईल असे मी म्हणालो होतो, त्याचाही मी त्याग करीन.” योशीयाची बाकीची कृत्ये व त्याने जे काही केले त्या सर्वांचे वर्णन यहूदाच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय?
२ राजे 23 वाचा
ऐका २ राजे 23
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: २ राजे 23:21-28
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ