YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ राजे 23:1-3

२ राजे 23:1-3 MARVBSI

मग राजाने यहूदातील व यरुशलेमेतील सर्व वडील जनांना बोलावणे पाठवून जमा केले. यहूदा येथील सर्व लोक, सर्व यरुशलेमेतले रहिवासी, याजक, संदेष्टे, सर्व आबालवृद्ध ह्यांना बरोबर घेऊन राजा परमेश्वराच्या मंदिराकडे गेला; परमेश्वराच्या मंदिरात सापडलेल्या कराराच्या ग्रंथातील सर्व वचने त्याने लोकांना ऐकू येतील अशी वाचून दाखवली. मग राजाने पीठावर उभे राहून परमेश्वरासमोर असा करार केला की, “मी परमेश्वराचे अनुसरण करीन व त्याच्या आज्ञा, निर्बंध व नियम जिवेभावे पाळीन, ह्या ग्रंथात लिहिलेली सर्व वचने पाळीन.” तेव्हा सर्व लोकांनी तो करार मान्य केला.