YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ राजे 13:14-20

२ राजे 13:14-20 MARVBSI

ज्या दुखण्याने अलीशा मरणार होता ते त्याला आता लागले; तेव्हा इस्राएलाचा राजा योवाश त्याच्याकडे गेला. तो ओणवून त्याचे मुख पाहून रडू लागला व म्हणाला, “बाबा! अहो बाबा! इस्राएलाच्या रथांनो! इस्राएलाच्या राउतांनो!” अलीशाने त्याला सांगितले, “धनुष्यबाण घेऊन ये.” तेव्हा तो धनुष्यबाण घेऊन त्याच्याकडे आला. त्याने इस्राएलाच्या राजाला सांगितले, “धनुष्याला आपला हात लाव.” त्याने आपला हात धनुष्याला लावला; तेव्हा अलीशाने आपले हात राजाच्या हातांवर ठेवले. मग त्याने सांगितले, “पूर्वेकडील खिडकी उघड.” त्याने ती उघडली. मग अलीशा त्याला म्हणाला, “बाण सोड.” तेव्हा त्याने तो सोडला. तो म्हणाला, “हा बाण परमेश्वराकडून होणार्‍या सोडवणुकीचे म्हणजे अरामापासून सुटण्याचे चिन्ह होय; तू अफेक येथे अराम्यांना असा मार देशील की त्यांचा धुव्वा उडेल.” त्याने त्याला म्हटले, “बाण उचलून घे.” त्याने ते उचलून घेतले. मग तो इस्राएलाच्या राजाला म्हणाला, “जमिनीवर बाण मार.” तो तीनदा मारून थांबला. देवाचा माणूस त्याच्यावर रागावून म्हणाला, “तू पाचसहा वेळा बाण मारायचे असते, म्हणजे अरामाचा क्षय होईपर्यंत तू त्याला मार दिला असतास; आता तू त्याला तीन वेळा मात्र मार देशील.” ह्यानंतर अलीशा मृत्यू पावला, व लोकांनी त्याला मूठमाती दिली. मग नव्या वर्षाच्या आरंभी मवाबी टोळ्यांनी देशावर स्वारी केली.