तरी आता मी आनंद करतो; तुम्हांला दु:ख झाले ह्यामुळे नव्हे, तर पश्चात्ताप होण्याजोगे दु:ख झाले ह्यामुळे; कारण देवानुसार तुमचे हे दु:ख दैवी होते; आमच्या हातून तुमची कसलीही हानी होऊ नये म्हणून असे झाले. कारण ईश्वरप्रेरित दुःख तारणदायी पश्चात्तापास कारणीभूत होते, त्याबद्दल वाईट वाटत नाही; पण ऐहिक दुःख मरणास कारणीभूत होते. कारण पाहा, तुमचे हे दुःख दैवी होते; ह्या एकाच गोष्टीने तुमच्यामध्ये केवढी कळकळ, केवढे दोषनिवारण, केवढा संताप, केवढे भय, केवढी उत्कंठा, केवढी आस्था, केवढी शिक्षा करण्याची बुद्धी उत्पन्न झाली! ह्या बाबतीत तुम्ही सर्व प्रकारे निर्दोष आहात ह्याचे प्रमाण तुम्ही पटवून दिले.
२ करिंथ 7 वाचा
ऐका २ करिंथ 7
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: २ करिंथ 7:9-11
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ