YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ करिंथ 7:8-13

२ करिंथ 7:8-13 MARVBSI

मी आपल्या पत्राने तुम्हांला दु:ख दिले ह्याबद्दल मला वाईट वाटत नाही; मला वाईट वाटले होते; कारण त्या पत्रापासून तुम्हांला काही वेळ तरी दु:ख झाले असे मला दिसते. तरी आता मी आनंद करतो; तुम्हांला दु:ख झाले ह्यामुळे नव्हे, तर पश्‍चात्ताप होण्याजोगे दु:ख झाले ह्यामुळे; कारण देवानुसार तुमचे हे दु:ख दैवी होते; आमच्या हातून तुमची कसलीही हानी होऊ नये म्हणून असे झाले. कारण ईश्वरप्रेरित दुःख तारणदायी पश्‍चात्तापास कारणीभूत होते, त्याबद्दल वाईट वाटत नाही; पण ऐहिक दुःख मरणास कारणीभूत होते. कारण पाहा, तुमचे हे दुःख दैवी होते; ह्या एकाच गोष्टीने तुमच्यामध्ये केवढी कळकळ, केवढे दोषनिवारण, केवढा संताप, केवढे भय, केवढी उत्कंठा, केवढी आस्था, केवढी शिक्षा करण्याची बुद्धी उत्पन्न झाली! ह्या बाबतीत तुम्ही सर्व प्रकारे निर्दोष आहात ह्याचे प्रमाण तुम्ही पटवून दिले. तथापि मी तुम्हांला लिहिले ते ज्याने अन्याय केला त्याच्यामुळे नव्हे, आणि ज्याच्यावर अन्याय झाला त्याच्यामुळेही नव्हे, तर आमच्याविषयी तुम्ही दाखवत असलेल्या कळकळीची जाणीव तुम्हांला देवासमक्ष व्हावी म्हणून लिहिले. ह्यामुळे आमचे सांत्वन झाले आहे; आणि आमचे सांत्वन झाले इतकेच नव्हे, तर विशेषेकरून तीताला आनंद झाल्यामुळे आम्हीही फारच आनंदित झालो; कारण तुम्हा सर्वांकडून त्याच्या मनाला स्वस्थता मिळाली.