YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ करिंथ 12:5-10

२ करिंथ 12:5-10 MARVBSI

अशा मनुष्याविषयी मी प्रौढी मिरवणार; मी स्वत:विषयी नाही, तर केवळ आपल्या दुर्बलतेची प्रौढी मिरवीन. कारण मी आपली प्रौढी मिरवण्याची इच्छा धरली तरी मी मूढ ठरणार नाही; मी खरे तेच बोलेन; तथापि मी बोलत नाही; कारण मी जो आहे म्हणून लोकांना दिसतो, किंवा माझ्याकडून लोक जे ऐकतात त्यापलीकडे मला कोणी मानू नये. प्रकटीकरणांच्या विपुलतेमुळे मी चढून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात एक काटा, म्हणजे मला ठोसे मारण्याकरता सैतानाचा एक दूत, ठेवण्यात आला आहे; मी फार चढून जाऊ नये म्हणून ठेवण्यात आला आहे. हा माझ्यापासून दूर व्हावा अशी मी प्रभूजवळ तीनदा विनंती केली; परंतु त्याने मला म्हटले आहे, “माझी कृपा तुला पुरेशी आहे; कारण अशक्तपणातच माझी शक्ती पूर्णतेस येते.” म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून मी विशेषेकरून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवीन. ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान, अडचणी, पाठलाग, संकटे ह्यांत मला संतोष आहे; कारण जेव्हा मी अशक्त तेव्हाच मी सशक्त आहे.