२ इतिहास 4
4
1मग त्याने पितळेची एक वेदी केली, तिची लांबीरुंदी वीस-वीस हात व रुंदी दहा हात होती.
2आणखी त्याने पितळ ओतून गंगाळसागर केला; ह्या काठापासून त्या काठापर्यंत त्याचा व्यास दहा हात होता; त्याचा आकार वाटोळा होता, त्याची उंची पाच हात होती व त्याच्या परिघाला तीस हात सूत लागे.
3त्याच्या खाली सभोवार एकेक हाताच्या अंतरावर दहा-दहा बैलांच्या आकृती केल्या होत्या; त्या गंगाळाच्या सभोवार होत्या; गंगाळ ओतले त्याबरोबर त्या बैलांच्या दोन रांगा ओतलेल्या होत्या.
4ते गंगाळ बारा बैलांवर ठेवले होते, तीन बैल उत्तराभिमुख, तीन पश्चिमाभिमुख, तीन दक्षिणाभिमुख व तीन पूर्वाभिमुख होते; त्यांच्यावर गंगाळसागर ठेवला होता; त्यांची मागली अंगे आतल्या बाजूस होती.
5त्याची जाडी चौंगाभर होती; त्याचे तोंड कटोर्याच्या तोंडासारखे असून त्यावर कमलपुष्पांचे काम केले होते; त्यात तीन हजार बथ2 पाणी मावे.
6त्याने धुण्यासाठी आणखी दहा गंगाळे करून पाच उजवीकडे व पाच डावीकडे ठेवली; त्यांत होमबलीच्या वस्तू धूत असत, पण गंगाळसागर हा फक्त याजकांना धुण्यासाठी असे.
7त्याने सोन्याच्या दहा समया विधीपूर्वक बनवल्या व त्या पाच उजवीकडे व पाच डावीकडे अशा मंदिरात ठेवून दिल्या.
8तशीच त्याने दहा मेजे करून उजवीकडे पाच व डावीकडे पाच अशी मंदिरात ठेवली. त्याने सोन्याचे शंभर कटोरे केले.
9आणखी त्याने याजकांचे अंगण व एक मोठे अंगण केले आणि अंगणाला दरवाजे करून त्यांची कवाडे पितळेने मढवली.
10त्याने तो गंगाळसागर मंदिराच्या उजवीकडे आग्नेयेस ठेवून दिला.
11हूरामाने हंडे, फावडी व कटोरे केले. ह्या प्रकारे हूरामाने शलमोन राजासाठी देवमंदिराचे जे काम करायचे होते ते संपवले.
12दोन खांब, त्यांवरील गोठ, दोहो खांबांच्या शेंड्यांवरील कळस व ह्या खांबांच्या शेंड्यांवरच्या कळसांचे दोन गोठ वेष्टण्यासाठी दोन जाळ्या केल्या.
13ह्या दोन जाळ्यांना चारशे डाळिंबे आणि खांबांच्या कळसांचे दोन गोठ झाकण्यासाठी एकेका जाळीसाठी डाळिंबांच्या दोन-दोन रांगा केल्या.
14त्याने चौरंग करून त्यांवर गंगाळे बनवून ठेवली;
15एक गंगाळसागर व त्याच्याखाली बारा बैल केले.
16हंडे, फावडी, काटे, इत्यादी सर्व सामान हूरामाने शलमोन राजासाठी परमेश्वराच्या मंदिराकरिता उजळ पितळेचे केले.
17राजाने ती यार्देन खोर्यात सुक्कोथ व सरेदा ह्यांच्यामधील प्रदेशातल्या चिकणमातीत ओतवली;
18शलमोनाने ही पात्रे विपुल बनवली; पितळेचे वजन काढले नाही.
19आणखी शलमोनाने देवमंदिरातील सर्व पात्रे, सोन्याची वेदी, व समर्पित भाकरी ठेवण्याची मेजे;
20दीपवृक्ष व त्यांचे शुद्ध सोन्याचे दिवे जे गाभार्यासमोर विधिपूर्वक जळत ठेवत असत ते;
21निर्भेळ सोन्याची फुले, दिवे व चिमटे;
22त्याप्रमाणेच शुद्ध सोन्याच्या कातरी, कटोरे, चमचे व धुपाटणीही बनवली; मग प्रवेशासाठी परमपवित्र-स्थानाच्या आतील कवाडे आणि मंदिराची कवाडे ही सोन्याची बनवली.
सध्या निवडलेले:
२ इतिहास 4: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.