दावीद तेथून निसटून निघाला आणि अदुल्लामाच्या गुहेत गेला; हे ऐकून त्याचे भाऊ व त्याच्या बापाच्या घरची सर्व माणसे त्या गुहेत त्याच्याकडे गेली. विपन्न, कर्जबाजारी व जिवाला त्रासलेले असे सर्व लोक त्याच्याजवळ जमा झाले, तो त्यांचा नायक झाला; सुमारे चारशे पुरुष त्याच्याजवळ जमले. तेथून दावीद मवाबातील मिस्पे येथे जाऊन मवाबाच्या राजाला म्हणाला, “परमेश्वर माझे काय करणार हे मला समजेपर्यंत माझ्या आईबापांना येऊन तुमच्याजवळ राहू द्या.” त्याने त्यांना मवाबाच्या राजासमोर आणले; दावीद तेथल्या गढीत राहत होता तोपर्यंत ते त्याच्याजवळ राहिले.
१ शमुवेल 22 वाचा
ऐका १ शमुवेल 22
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: १ शमुवेल 22:1-4
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ